Shivtej Din 2021 Wishes: शिवतेज दिनाच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी शुभेच्छापत्र, WhatsApp Status, Facebook Messages!
शिवतेज दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र, WhatsApp Status, मेसेजेस, HD Images and Photos
छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रशासन आजही जगाला दिशादर्शक आहे असे मानलं जातं. शिवरायांनी शक्तीपेक्षा युक्तीने अनेक लढया जिंकल्या. त्यापैकीच एक म्हणजे लालमहालात शाहिस्तेखनाची बोटं छाटून मुघलांना दिलेले सडेतोड उत्तरं. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखनाचा कोथळा काढल्यानंतर शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्तेखानला धाडलं होतं. पण याच शाहिस्तेखानाला पळता भुई थोडी करणारा एक प्रसंग म्हणजे लाल महालातील शिवरायांचा सर्जिकल स्ट्राईल. महराजांच्या कामगिरीमधील ही मोहिम शिवतेज प्रताप म्हणून ओळखली जाते. ही घटना चैत्र शुक्ल अष्टमी ची आहे. यंदा हा दिवस ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, 20 एप्रिल 2021 दिवशी आहे. त्यामुळे शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे अनेक शिवप्रेमी या लढाईची आठवण साजरी करत शिवप्रताप दिन (Shivtej Pratap Din) दरवर्षी साजरी करतात. मग यंदा देखील याच दिवसाच्या आठवणी ताज्या करत तुम्हांला महाराजांप्रती आदर व्यक्त करायचा असेल तर व्हॉट्सअॅप, फेसबूक, टेलिग्राम, इंस्टाग्राम सह सोशल मीडीयाच्या विविध प्लॅटफॉर्मवर ही खास शुभेच्छापत्र तुम्ही नक्की शेअर करू शकता.(नक्की वाचा: Shivtej Din 2021 Messages: शिवतेज दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मराठमोळे Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून शिवभक्तांना द्या खास शुभेच्छा!)
शिवतेज प्रताप दिन शुभेच्छा
शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! शिवतेज दिनाच्या शुभेच्छा
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला 'शिवबा' होता
जय शिवराय
शिवरायांचं बालपण गेलेल्या लालमहालामध्ये गेले होते. शाहिस्तेखान पुण्यामध्ये स्वैराचार माजवत असल्याचं जेव्हा महराजांना समजले तेव्हा जिजाऊंसह काही मोजके मावळे घेऊन महाराजांनी शाहिस्तेखानाला अद्दल घडवण्याचा प्लॅन आखला होता. आजच्या सर्जिकल स्ट्राईक अंदाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लालमहलात घुसले. अचानक शिवरायांसह मावळ्यांची फौज आल्याने शाहिस्तेखान बिथरला. महाराजांच्या हल्ल्यामध्ये त्याची 3 बोटं छाटण्यात आली. तसेच शाहिस्तेखानाचा मुलगा ठार झाला. या मोहिमेनंतर 3 दिवसांत शाहिस्तेखान दिल्लीला पळाला. दरम्यान ही घटना एप्रिल 1663 सालची आहे.