Shivrajyabhishek Din 2021: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, HD Images, Wallpapers, Greetings शेअर करुन शिवमय करा आजचा दिवस!
त्याकरीता तुमच्यासाठी खास मराठी HD Images, Wallpapers, Greetings घेऊन आलो आहोत.
Shivrajyabhishek Din HD Images: छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. त्या दिवशी शिवरायांना 'शिवछत्रपती' होण्याचा सन्मान प्राप्त झाला आणि पुढे महाराजांना पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले गेले. बुद्धी, शौर्य, धडाडी, निष्ठा आणि धैर्य या जोरावर महाराजांनी शत्रूंना पराभूत करुन भारतभूमीवर आपली पकड मजबूत केली. या कार्यात महाराजांना मावळ्यांची अखंड साथ आणि जनतेचे अमुल्य प्रेम मिळाले. आजही महाराजांचे स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अबाधित आहे. याची परिणीती म्हणून आजही राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर शिवभक्तांची मोठी गर्दी होते. राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
कोविड-19 संकटामुळे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नसला तरी सोशल मीडिया माध्यमातून शुभेच्छा देऊन शिवरायांना प्रणाम करु शकता. त्याकरीता तुमच्यासाठी खास मराठी HD Images, Wallpapers, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करा.
शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा!
यंदा 'शिवराज्याभिषेक दिन' महाराष्ट्रात 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसंच राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यासाठी काही नियम सरकारने लागू केले आहेत.