Chhatrapati Shivaji Maharaj Quotes: शिवजयंती चं औचित्य साधत पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहचवा शिवरायांचे हे सकारात्मक विचार!

मग खास HD Images च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठमोळे विचार (Chhatrapati Shivaji Maharaj Quotes) शेअर करण्यासाठी आम्ही बनवलेले काही फोटो तुम्हांला नक्कीच मदत करू शकतील.

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes| File Image

Shiv Jayanti 2020 Marathi Quotes:  छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या बाबत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक विशेष स्थान आहे. मूठभर मावळ्यांच्या साथीने महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या शिवरायांचा जन्म दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्र शासन आणि शिवभक्त या दिवसाचं औचित्य साधून शिवरायांचा जन्मसोहळा मोठ्या धामधूमीमध्ये साजरा करतात. यंदा देखील 19 फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shiv Jayanti)  मोठ्या जल्लोषात साजरी करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जगभरातील शिवभक्तांनी केलं आहे. पण या सेलिब्रेशन सोबतच आता पुढच्या पिढीला छत्रपतींचा इतिहास आणि विचार देखील पोहचवण्याची आपली जबाबदारी आहे. मग यंदाच्या शिवजयंतीचं औचित्य साधून महाराजांच्या पराक्रम कथा सांगून यावर्षी सेलिब्रेशन करून पहा. मग खास HD Images च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठमोळे विचार (Chhatrapati Shivaji Maharaj Quotes) शेअर करण्यासाठी आम्ही बनवलेले काही फोटो तुम्हांला नक्कीच मदत करू शकतील. Shiv Jayanti 2020 Marathi Wishes: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश, Messages, Whatsapp Status, Greetings आणि शुभेच्छापत्रं शेअर करुन साजरा करा यंदाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव!

शिवजयंतीचा सोहळा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी दिवशी साजरा केला त्यासोबतच हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 दिवशी झाला आहे अशी नोंद असल्याने त्या दिवशी देखील त्याचं सेलिब्रेशन केलं जातं. Shiv Jayanti 2020 Date: शिवजयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्याचा इतिहास व महत्त्व काय?

 छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes| File Image

  • जेव्हा माणूस प्रतिकुल परिस्थितीमध्येही आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तेव्हा वेळ देखील त्याच्यासाठी स्वतःहून बदलते - छत्रपती शिवाजी महाराज 

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes| File Image

  • स्वातंत्र्य एक  वरदान आहे आणि ते मिळवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.  - छत्रपती शिवाजी महाराज  

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes| File Image

  • शत्रूला दुर्बल समजू नका, पण तो अधिक बलवान आहे असं समजून घाबरून देखील जाऊ नका - छत्रपती शिवाजी महाराज  

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes| File Image

सन 1869 साली जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर खास पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे कार्य सामान्यांच्या घरात पोहचावे यासाठी जोतीराव फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती साजरी केली. त्यावेळेस शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. पुढे लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी शिवजयंती मोठ्या स्वरूपात साजरी करण्याला सुरूवात केली.