IPL Auction 2025 Live

Shirdi Sai Baba Punyatithi 2019 Live Aarti: साईबाबां च्या पुण्यतिथी निमित्त शिर्डीतील साईंच्या काकड आरती चे व्हा साक्षीदार, येथे पाहा Live Streaming

याच भक्तांना ज्यांना कामानिमित्त किंवा अन्य कोणत्या कारणास्तव या उत्सवात सहभागी होता येणार नाही. त्यांना पुढे दिलेल्या लिंकवर Live काकड आरती अनुभवता येईल.

Shirdi Sai Baba (Photo Credits: PTI)

दसरा (Dussehraआणि साईबाबांची पुण्यतिथी (Sai Baba Punyatithi) हा अदभूत दिवस म्हणजे भक्तांसाठी जणू पर्वणीच. या दिवशी लाखो भक्त शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येतात. 1918 मध्ये दस-याच्याच दिवशी ते अनंतात विलीन झाले होते. म्हणून आपल्या लाडक्या साईबाबांच्या दर्शनासाठी त्यांचे भक्त शिर्डीत (Shirdi) येतात आणि मनोभावे आपल्या साईंचरणी लीन होतात. यंदाही साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीत भव्यदिव्य अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला आजपासून (7 ऑक्टोबर) सुरुवात झाली असून 10 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव रंगणार आहे. या उत्सवात श्रींच्या काकड आरती पासून ते श्रींच्या शेजारती होणार आहे.

साईंच्या प्रिय भक्तांना शिर्डीचा हा अद्भूत सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता यावा यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच भक्तांना ज्यांना कामानिमित्त किंवा अन्य कोणत्या कारणास्तव या उत्सवात सहभागी होता येणार नाही. त्यांना पुढे दिलेल्या लिंकवर Live काकड आरती अनुभवता येईल.

येथे पाहा शिर्डी साईबाबांची Live काकड आरती

या सोहळ्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता पालखीव्‍दारे येणा-या पदयात्री साईभक्‍तांकरीता स्‍वतंत्र पालखी गेट सुरु करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली. हेदेखील वाचा- Shirdi Sai Baba Punyatithi Utsav 2019: श्री साईबाबा यांच्या 101 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री शिर्डी साईसंस्थानातर्फे विशेष सोहळा, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

पालखीतील पदयात्रींच्‍या भावनांचा विचार करुन व सुरक्षा यंत्रनेच्‍या अभिप्रायाअंती येत्‍या श्री पुण्‍यतिथी (दसरा) उत्‍सवापासून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता पालखीव्‍दारे येणा-या पदयात्री साईभक्‍तांना हा स्‍वतंत्र पालखी गेट सुरु करण्‍यात येणार आहे. याकरीता पालखी प्रमुखांनी पालखी निघण्‍यापुर्वी संस्‍थानच्‍या संरक्षण विभागात नोंदणी करणे गरजेचे असल्‍याचे ही डॉ.हावरे यांनी सांगितले.