Lakshmi Pujan 2022 Message In Marathi: लक्ष्मी पूजनानिमित्त खास संदेश तुमच्या प्रियजनांना करा शेअर, Facebook, Whatsapp वर करा पोस्ट
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने, आम्ही तुमच्यासाठी अनेक सुंदर शुभेच्छा आणि संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.
लक्ष्मी पूजन (Lakshmi Pujan) हा एक शुभ विधी आहे. जो दिवाळी (Diwali) दरम्यान केला जातो. जेव्हा आपल्या जीवनात समृद्धी आणि संपत्ती आणण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते आणि ती फक्त स्वच्छ असलेल्या घरांना भेट देते. म्हणून, या दिवशी लोक आपली घरे पूर्णपणे स्वच्छ करतात आणि नवीन कपडे घालतात. या दिवशी लोक कुबेराची पूजा करतात. कुटुंबातील स्त्रिया या दिवशी स्वतःला लक्ष्मीचा अवतार मानतात. पणत्या लावल्या जातात आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवल्या जातात. या दिवशी पूजेशिवाय लोक फटाकेही जाळतात. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. हेही वाचा Lakshmi Pujan 2022 Wishes: लक्ष्मी पूजनानिमित्त WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा द्या मंगलमय शुभेच्छा!
नवीन काहीतरी खरेदी करण्यापासून ते नवीन गुंतवणूक सुरू करण्यापर्यंत लक्ष्मीपूजनाचा दिवस शुभ मानला जातो. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने, आम्ही तुमच्यासाठी अनेक सुंदर शुभेच्छा आणि संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.
लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून जावो,
लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा !
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा !
धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख-समृद्धीने भरू दे
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा