Ramadan Eid 2020 Wishes | File Image

Eid Mubarak 2020 Wishes: मुसलमान धर्मीयांची कालगणना चांद्रमानानुसार असते. त्यातील रमजान हा महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शुक्ल प्रतिपदेच्या चंद्र दर्शनाने रोझे (Roza) सुरु होतात आणि शव्वाल या दहाव्या महिन्यातील चंद्रदर्शनाने त्याची सांगता होते. चंद्र दर्शनानंतर दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. रमजान ईदला 'ईद-उल्-फित्र' देखील म्हणतात. फित्र हा शब्द दानाची कल्पना सूचित करतो. म्हणून या दिवशी दान करण्यावर भर दिला जातो. ईद निमित्त धान्य, वस्त्र इत्यादी दान केले जाते. रमजान ईद मुसलमान बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि मोठा सण आहे. या सणानिमित्त अनेक मुसलमान बंधु-भगिनी नविन कपडे घालून, नटून थटून एका ठिकाणी जमतात. या ठिकाणाला 'ईदगाह' असे म्हणतात. त्या ठिकाणी एकत्रितरित्या नमाज पठण केले जाते. त्यानंतर खुताबा पार पडतो. ईदगाह येथे प्रार्थना चालवणारा इमाम सर्वांना अल्लाचे माहात्म्य सांगतात त्यास 'खुताबा' असे म्हणतात. नंतर लोक एकमेकांना अलिंगद देऊन 'ईद मुबारक' म्हणतात.

मात्र यंदा या आनंदाच्या सणावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे देशभरात ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी केली जाईल. ईदीला सामाजिक स्वरुप प्राप्त होणार नाही. लॉकडाऊनमुळे एकमेकांच्या घरी जाऊन भेटी देऊन ईदीचा आनंद साजरा करता येणार नाही. मात्र सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पाठवून ईदचा उत्साह तुम्ही कायम ठेऊ शकता. यासाठी काही संदेश, मेसेजेस, शुभेच्छापत्रं, ग्रिटींग्स, व्हॉट्सअॅप स्टेटस, Images सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून ईद मुबारकच्या शुभेच्छा द्या.

रमजान ईद शुभेच्छा!

ईद लेकर आती है ढेर सारी खुशियां;

ईद मिटा देती है इंसान में दूरियां;

ईद है ख़ुदा का एक नायाब तौफा;

और हम भी कहते हैं आपको ईद मुबारक।

Ramadan Eid 2020 Wishes | File Image

दिए जलते और जगमगाते रहें,

हम आपको इसी तरह

याद आते रहें,

जब तक जिंदगी है

ये दुआ है हमारी,

आप ईद के चॉंद की

तरह जगमगाते रहें!

ईद मुबारक!

Ramadan Eid 2020 Wishes | File Image

गुल ने गुलशन से गुलफाम भेजा है,

सितारों ने आसमान से सलाम भेजा है,

मुबारक हो आपको रमादान का महिना,

ये पैगाम हमने सिर्फ आपको भेजा है..

ईद मुबारक!

Ramadan Eid 2020 Wishes | File Image

सदा हँसते रहो जैसे हँसते हैं फूल;

दुनिया के सारे गम तुम जाओ भूल;

चारों तरफ फ़ैलाओ खुशियों के गीत;

इसी उम्मीद के साथ तुम्हें मुबारक हो ईद।

ईद मुबारक!

Ramadan Eid 2020 Wishes | File Image

रात को नया चाँद मुबारक

चाँद को चाँदनी मुबारक;

फलक को सितारे मुबारक

सितारौं को बुलंदी मुबारक

और आपको ईद मुबारक!

Ramadan Eid 2020 Wishes | File Image

GIF's

 

via GIPHY

via GIPHY

रमजान महिन्यातील रोझा म्हणजेच उपवास फार कडक असतात. सूर्योदयापूर्वी एका तासापासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न-पाण्याशिवाय कडकडीत उपवास करायचा असतो. या महिन्यात स्वयंशिस्त पाळत, करमणूक टाळायची असते आणि अधिकाधिक वेळ प्रार्थनेत व्यतीत करायचा असतो. लहान मुले, गरोदर स्त्रिया यांनी रोझा पाळला नाही तर चालतो. परंतु, या महिन्यातील 27 वा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे इतर दिवशी जमले नाही तरी लोक या दिवशी उपवास करतात. या कडक उपवासानंतर रमजानच्या दिवशी खाद्यपदार्थांची विशेष रेलचेल असते. या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी शीरखुर्मा हा गोड पदार्थ बनवला जातो. तसंच गिफ्ट किंवा पैसे देऊन म्हणजेच ईदी देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला जातो.