Pandharpur Ashadhi Wari 2023 Timetable: पंढरपूर आषाढी वारी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक, घ्या जाणून
Ashadi Wari 2023 Schedule: पंढरपूर वारी 10 जून 2023 पासून सुरु होणे अपेक्षीत आहे. आपण जर यंदाची वारी करण्याचा विचार करत असाल तर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg)आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा (Dnyaneshwar Palkhi Yatra Marg) मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणे आवश्यक आहे.
Pandharpur Ashadi Wari 2023 Schedule: पंढरपूर वारी (Pandharpur Wari ) हे महाराष्ट्रातील आणि जगभरातील वारकरी सांप्रदायाचा जगण्याचा भाग. कित्येक वर्षांपासून चालत आलेली परंपरा. वारकरी सांप्रदाय आणि वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका घेऊन वारी मार्गाने पंढरपूरला निघतो. आषाढी आणि कार्तिकी एकादसशीला पंढरपूर (Pandharpur) येथे जाऊन सावळ्या विठुरायाच्या (Lord Vittal) म्हणजेच विठ्ठल-रुक्मिणीच्या पायावर डोके ठेवतो. या वारीचेही खास वेळापत्रक असते. या वारीसाठी पंढरपूर वारी म्हणजे संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) अशा पालख्या निघतात. ज्या वारीतील महत्त्वाचा घटक असतात. यंदा ही वारी 10 जून 2023 पासून सुरु होणे अपेक्षीत आहे. आपण जर यंदाची वारी करण्याचा विचार करत असाल तर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg)आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा (Dnyaneshwar Palkhi Yatra Marg) मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणे आवश्यक आहे.
कधी आहे पंढरपूर वारी 2023 ?
पंढरपूर वारी 2023 साठी संत तुकाराम महाराजांची पालखी 10 जूनपासून निघेल. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 11 जून 2023 पासून निघेल. पालखीसोबत निघालेली दिंडी पालखीमार्गावरुन मार्गस्त होईल. दरम्यान, ती नियोजीत वेळेनुसार अनेक ठिकाणी विसावा घेईल. मजल दरमजल करत ही वारी पंढरपूरला पोहोचेल. दरम्यान, यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या किंवा आशीर्वाद घेऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी मुक्कामाच्या अचूक तारखा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या तारखा खालील प्रमाणे.
संत तुकाराम महाराज पालखी यात्रा मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक
Date | Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg |
June 11, 2023 | Katevadi |
June 20, 2023 | Belvandi |
June 22, 2023 | Igatpuri |
June 24, 2023 | Akluj Mane Vidyalaya |
June 25, 2023 | Malinagar |
June 27, 2023 | Bajirao Vihar |
June 28, 2023 | Pandharpur |
ट्विट
View this post on Instagram
A post shared by जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान (@shri_sant_tukaram_maharaj_dehu)
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग वारी वेळापत्रक
Date | Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Marg |
June 20, 2023 | Khandobacha Limb |
June 24, 2023 | Purandvade |
June 25, 2023 | Khudus Phata |
June 26, 2023 | Karuvachi Samadhi |
June 27, 2023 | Bajirao Vihar |
June 28, 2023 | Pandharpur |
June 27, 2023 | Bajirao Vihar |
June 28, 2023 | Pandharpur |
ट्विट
View this post on Instagram
A post shared by श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ,आळंदी देवाची (@santdnyaneshwarmaharaj)
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पालखी पूर्ण झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या पालखीला अनेकजण आषाढी पालखी असेही म्हणतात. या संतांचा सन्मान करणाऱ्या दोन नामांकित पालख्यांची सुरुवात पुणे जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या गावापासून होते - संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीतून निघते, तर तुकारामांची पालखी देहू येथून निघते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)