World Birthday Day Memes: जागतिक वाढदिवस दिनाच्या दिवशी 'हे' खास मीम्स शेअर करून द्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

तुमच्या एखाद्या मित्राचा जन्म 1 जूनलाचं झाला असेल तर तुम्ही खालील हटके मीम्स शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

World Birthday Day Memes: जागतिक वाढदिवस दिनाच्या दिवशी 'हे' खास मीम्स शेअर करून द्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!
World Birthday Day Memes (फोटो सौजन्य - File Image)

World Birthday Day Memes: 1 जून या दिवशी भारतातील अनेक लोकांचा वाढदिवस साजरा केला जातो. गमतीने लोक या दिवसाला 'शैक्षणिक' किंवा 'सरकारी' वाढदिवस असे संबोधतात. 1 जून भारतातील सर्वात जास्त लोकांचा वाढदिवस असणारा दिवस आहे. सन 1980 पर्यंत जन्म-मृत्यच्या तारखेच्या नोंदी करण्याबाबत लोकांमध्ये फारशी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या तारखेला आणि कोणत्या दिवशी जन्माला आले, हे अनेक आई-वडिलांच्या लक्षात राहत नसे. ही मुले जेव्हा मोठी होऊन त्यांना शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना 'अचूक जन्मतारीख' माहित नसायची. तेव्हा गुरूजी मुलाला हात वर करायला लावत. गुरुजींच्या कानापर्यंत हात आले की मुलगा शाळेत येण्याइतका मोठा म्हणजे पाच वर्षांचा झाला, असे समजले जात असे.

त्यावेळी जन्मतारखेला फारसे महत्त्व नसे. शाळेत नाव नोंदवतांना वयाची अट मात्र पूर्ण करावी लागायची. ही अट पूर्ण करण्याचा कालावधी 1 जूनपासून मोजला जात असे.

मग 'सोईचे' व्हावे म्हणून अशा मुलांना गुरुजी 1 जून ही जन्मतारीख देत असत. त्यामुळे 1 जून रोजी देशातील अनेक व्यक्तींचा वाढदिवस असतो. तथापि, हा दिवश सार्वजनिक वाढदिवस दिन (Public Birthday Day) किंवा जागतिक वाढदिवस दिन (World Birthday Day) म्हणून देखील साजरा केला जातो. तथापि, तुमच्या एखाद्या मित्राचा जन्म 1 जूनलाचं झाला असेल तर तुम्ही खालील हटके मीम्स शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

ज्यांचा 1 जूनला जन्म झाला आहे आणि

ज्यांचा शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी

या दिवशी जन्म झाला आहे

अशा सर्वांना

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

World Birthday Day Memes 1 (फोटो सौजन्य - File Image)

गुरुजींच्या कृपेने

1 जून वाढदिवस लाभलेल्या

सर्व बंधू भगिनींना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

World Birthday Day Memes 2 (फोटो सौजन्य - File Image)

पहिलीच्या वर्गात दाखल होताना,

गुरुजींच्या नोंदणीने 1 जून ही जन्मतारख

प्राप्त झालेल्या माझ्या सर्व हितचिंतकांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

World Birthday Day Memes 3 (फोटो सौजन्य - File Image)

ZP शाळेतील शिक्षकांच्या पुण्याईने

वाढदिवस आजच येणार्या सगळ्यांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

World Birthday Day Memes 4 (फोटो सौजन्य - File Image)

सार्वजनिक वाढदिवस

1 जूनला जन्मलेल्या

माझ्या तमाम मित्रांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

World Birthday Day Memes 5 (फोटो सौजन्य - File Image)

भारतात अनेक लोकांचा वाढदिवस 1 जून रोजी साजरा केला जात असल्यामुळे हा दिवस 'वाढदिवस दिन' ठरला आहे. 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तथापि, एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस खरोखरच 1 जून रोजी असला तरी अनेक जण त्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात. कारण, त्यांना त्या व्यक्तीची तारीख गुरुजींनी शाळेत लावलेल्या सार्वजनिक वाढदिवसाच्या तारखेसारखी वाटते. त्यामुळे तुम्ही वरील मीम्स शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा दिवस आणखी खास करू शकता.

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).