Happy Navratri 2024 Advance Wishes in Marathi: नवरात्र उत्सवानिमित्त Messages, Greetings, Images शेअर करून मित्र-परिवारास द्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा!
त्यामुळे तुम्हाला देखील आपल्या मित्र-परिवारास खास नवरात्रीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी खास नवरात्री ग्रेंटिंग्ज, नवरात्री संदेश मराठी, नवरात्री मराठी स्टेटस, नवरात्री मराठी बॅनर, कोटस, शायरी, फोटो, इमेजेस घेऊन आलो आहोत.
Happy Navratri 2024 Advance Wishes in Marathi: शारदीय नवरात्री (Sharadiya Navratri 2024)ला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. या काळात भक्त नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा-अर्चा करतात. शारदीय नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. भक्त नऊ दिवस देवीची पूजा करतात, उपवास करतात आणि नवव्या दिवशी कन्या पूजा करतात. शारदीय नवरात्री आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि नवमी तिथीपर्यंत चालते.
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षी, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 12:18 पासून सुरू होत आहे, जी 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:58 पर्यंत चालेल. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सावाच्या शुभेच्छा देण्याचीही प्रथा आहे. त्यामुळे तुम्हाला देखील आपल्या मित्र-परिवारास खास नवरात्रीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी खास अॅडव्हान्स नवरात्री ग्रेंटिंग्ज, नवरात्री संदेश मराठी, नवरात्री मराठी स्टेटस, नवरात्री मराठी बॅनर, कोटस, शायरी, फोटो, इमेजेस घेऊन आलो आहोत. (Navratri 2024 Home Decoration Ideas: शारदीय नवरात्रीला करता येतील असे हटके डेकोरेशन आयडिया, येथे पाहा व्हिडीओ)
आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य,
धन, शिक्षण,
सुख, समृद्धी,
भक्ती आणि शक्ती देवो .
जय आंबा माता
हॅप्पी नवरात्री!
आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…
||अंबे माता की जय||
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..
नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
यावर्षी शारदीय नवरात्री 11 ऑक्टोबर 2024 रोजी संपेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी साजरी केली जाईल. शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने कलश स्थापना म्हणजेच घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते.