Guru Purnima 2023 HD Images: गुरु पौर्णिमेनिमित्त Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छापत्र शेअर करून करा गुरूंना वंदन!

Guru Purnima 2023 HD Images (PC - File Image)

Guru Purnima 2023 HD Images: गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी 3 जुलै रोजी गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023) साजरी करण्यात येणार आहे. याला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार, महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला सुमारे 3000 ईसापूर्व झाला होता, म्हणून त्यांच्याप्रती खरी भक्ती दाखवण्यासाठी, आषाढ पौर्णिमा ही त्यांची जयंती म्हणून दरवर्षी साजरी केली जाते.

या दिवशी व्यासजींनी आपल्या शिष्यांना भागवतपुराणाचे ज्ञान दिले, म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा श्रवण करण्याची श्रद्धा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आपल्या गुरूंना सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छापत्र शेअर करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करू शकता. (हेही वाचा - World Social Media Day 2023: सोशल मीडिया दिवस का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास? जाणून घ्या)

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,

लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima 2023 HD Images (PC- File Image)

आई वडील प्रथम गुरु,

त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Guru Purnima 2023 HD Images (PC - File Image)

गुरु म्हणजे माय बापं

नाम घेता हरतील पापं,

गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा!

Guru Purnima 2023 HD Images (PC - File Image)

ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या

विश्वातील सर्व गुरुंना वंदना

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Guru Purnima 2023 HD Images (PC - File Image)

ज्यांनी आपल्याकडील विद्या नि:स्वार्थ अपर्ण केली

अशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम!

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Guru Purnima 2023 HD Images (PC - File Image)

पौराणिक मान्यतेनुसार गुरु वेद व्यासजींना भगवान विष्णूचे अंश मानले जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचे रूप मानल्या जाणाऱ्या भगवान सत्यनारायणाची कथा ऐकवली जाते. विष्णु पुराणातही पौर्णिमा तिथी भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम तिथींपैकी एक आहे असा उल्लेख आहे.