Navratri Colours 2026 List In Marathi: शारदीय नवरात्रीतील यंदाचे नऊ रात्रीतील नऊ रंग कोणते?
नवरात्रीच्या रंगांचा क्रम प्रत्येक दिवसाच्या क्रमांकाशी कायमस्वरूपी बांधलेला नसतो. घटस्थापना कोणत्या वाराला येते, यावर हा क्रम ठरत असतो. यंदा या रंगांची सुरूवात केशरी रंगाने होत आहे. पहा इथे संपूर्ण यादी !
गणेशोत्सवानंतर आता तरूणाईला नवरात्रीचे (Navratri) वेध लागले आहेत. यंदा नवरात्रीची सुरूवात रविवार 11 ऑक्टोबर पासून होणार आहे तर सांगता 20 ऑक्टोबरला दसरा दिवशी होईल. शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवात देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते महिला या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करण्याची परंपरा पाळली जातात.दरम्यान यामागे कोणताही धार्मिक संबंध नाही पण महिलांमधील एकतेची भावना रूजणारा हा उपक्रम आता सणाचा भाग झाला आहे.
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापनेने नवरात्रीची सुरुवात होते. यंदा प्रतिपदा तिथी शनिवार, १० ऑक्टोबर रोजी रात्री सुरू होऊन रविवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री समाप्त होणार आहे, त्यामुळे घटस्थापना ११ ऑक्टोबर रोजी होईल.मग पहा यंदाचे नवरात्रीतील नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते?
नवरात्री 2026 नऊ रात्री नऊ रंग
| दिवस | तारीख | वार | रंग |
|---|---|---|---|
| दिवस १ | ११ ऑक्टोबर | रविवार | केशरी |
| दिवस २ | १२ ऑक्टोबर | सोमवार | पांढरा |
| दिवस ३ | १३ ऑक्टोबर | मंगळवार | लाल |
| दिवस ४ | १४ ऑक्टोबर | बुधवार | निळा |
| दिवस ५ | १५ ऑक्टोबर | गुरुवार | पिवळा |
| दिवस ६ | १६ ऑक्टोबर | शुक्रवार | हिरवा |
| दिवस ७ | १७ ऑक्टोबर | शनिवार | राखाडी |
| दिवस ८ | १८ ऑक्टोबर | रविवार | जांभळा |
| दिवस ९ | १९ ऑक्टोबर | सोमवार | मोरपंखी हिरवा |
नऊ रंग आणि त्याचा अर्थ
प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ आणि महत्त्व जोडलेले आहे. केशरी रंग उत्साह आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो, तर पांढरा रंग शांतता आणि पावित्र्य दर्शवतो. लाल रंग शक्ती, प्रेम आणि धैर्याचे प्रतीक आहे, तर निळा रंग शहाणपण आणि खोलीचे दर्शक मानला जातो. पिवळा रंग आनंद आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे, तर हिरवा रंग वाढ आणि समतोल दर्शवतो. करडा रंग मन आणि भावनांमधील संतुलनाचे प्रतीक मानला जातो, तर जांभळा रंग समृद्धी आणि ऐश्वर्याशी जोडला जातो. मोरपंखी हिरवा रंग हा नवीन सुरुवात आणि पूर्णत्वाचे प्रतीक मानला जातो.
नवरात्रीच्या रंगांचा क्रम प्रत्येक दिवसाच्या क्रमांकाशी कायमस्वरूपी बांधलेला नसतो. घटस्थापना कोणत्या वाराला येते, यावर हा क्रम ठरत असतो. त्यामुळे दरवर्षी हा क्रम थोड्याफार प्रमाणात बदलताना दिसतो.