Mumbai Ganpati Visarjan Muhurt: गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या, संपूर्ण माहिती
श्री गणेशमूर्तीची स्थापना चतुर्थीला केली जाते आणि चतुर्दशीला विसर्जन केले जाते. 10 व्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करून भगवान पुन्हा कैलास पर्वतावर पोहोचतात, अशी समाज आहे.
Mumbai Ganpati Visarjan Muhurt: भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून चतुर्दशी तिथीपर्यंत गणेश चतुर्थी हा सण गणेशाची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. श्री गणेशमूर्तीची स्थापना चतुर्थीला केली जाते आणि चतुर्दशीला विसर्जन केले जाते. 10 व्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करून भगवान पुन्हा कैलास पर्वतावर पोहोचतात, अशी समाज आहे. स्थापनेपेक्षा विसर्जन अधिक गौरवपूर्ण आहे. या दिवशी पूजा केल्यास अनंत फळ मिळतात. म्हणून या दिवसाला अनंत चतुर्दशी असेही म्हणतात. दरम्यान, आज सकाळपासून बाप्पाच्या विसर्जनासाठी भाविक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. आणि 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर त्यांच्या मूर्तीला विसर्जीत केले जात आहे.
आज गणपती विसर्जनासाठी तीन शुभ मुहूर्त आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार विसर्जनाचा पहिला मुहूर्त सकाळी 6.04 ते 10.43 पर्यंत असेल. यानंतर दुसरा मुहूर्त दुपारी 12:16 ते 04:54 पर्यंत राहील.तर तिसरा शुभ मुहूर्त 04:55 ते 06:27 पर्यंत असेल.
अनंत चतुर्दशीचे महत्त्व :
मोक्षप्राप्तीसाठी या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. त्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत पाळले जाते. बंधनाचे प्रतीक असलेला धागा हातावर बांधला जातो आणि उपवास सोडताना तो उघडला जातो. यामध्ये मीठाचे सेवन करू नये. गणेशाची मूर्ती अनवाणी जाणून विसर्जन करा. प्लास्टिकच्या मूर्ती किंवा चित्रांची स्थापना किंवा विसर्जन करू नका. मातीची मूर्ती सर्वोत्तम आहे. विसर्जनानंतर हात जोडून श्री गणेशाकडून कल्याण आणि समृद्धीची कामना करा.