Mumbai Cha Raja 2020 Live Darshan Online: गणेश गल्लीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी YouTube, Facebook च्या या लिंकवर करा आणि घरबसल्या पहा रूप
मुंबईचा राजा अशी शान मिरवणार्या या गणपतीच्या भाविकांना 22 ऑगस्ट पासून ऑनलाईन माध्यमातून मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीचं ऑनलाईन माध्यमातून 10 दिवस दर्शन मिळणार आहे.
Ganesh Galli Ganpati 2020 Live Darshan Online: महाराष्ट्रात यंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोना संकटाचं सावट असल्याने यावर्षी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ते अनंट चतुर्दशी (Anant Chaturdashi) पर्यंत 10 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान दक्षिण मुंबईमधील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली (Ganesh Galli) कडूनदेखील उत्सव मूर्ती ऐवजी 4 फूटाची पुजा मूर्ती पुजली जाणार आहे. मुंबईचा राजा अशी शान मिरवणार्या या गणपतीच्या भाविकांना 22 ऑगस्ट पासून ऑनलाईन माध्यमातून मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीचं ऑनलाईन माध्यमातून 10 दिवस दर्शन मिळणार आहे. इंस्टाग्राम, युट्युब चॅनलच्या माध्यमातून हे दर्शन मोफत उपलब्ध असेल. Mumbaicha Raja & Chintamani's First Look: चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा गणेशगल्ली 2020 चा First Look जारी; इथे पहा फोटोज!
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे 93 वे वर्ष साजरे करत आहे. कोरोनामुळे यंदा मंडपामध्ये सामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही, मात्र घरबसल्या दर्शनाची सोय खुली करण्यात आली आहे. मग तुम्ही देखील लालबागमधील गणेश गल्लीच्या बाप्पाचे भक्त असाल तर इथे पहा बाप्पाचं लाईव्ह दर्शन!
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली चं लाईव्ह दर्शन
फेसबूक पेज - facebook.com/GaneshGalli
इंस्टाग्राम - instagram.com/raja_mumbaicha/
वेबसाईट- mumbaicharaja.co
युट्युब चॅनल - youtube.com/c/MumbaiChaRaja22/featured
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली च्या युट्युब पेजवर गणपती बाप्पाची आरती नियमित 10 दिवस ऑनलाईन दाखवली जाते. त्यामुळे यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरीच राहून बाप्पाचं दर्शन घ्या आणि विघ्नहर्त्याकडे सार्याचं कोरोनापासून रक्षण करण्याची प्रार्थना करा. दरम्यान हा गणपती 10 दिवसांचा असल्याने 1 सप्टेंबर दिवशी त्याच विसर्जन होईल.
मुंबईमध्ये अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत आरोग्य शिबिरं, रक्तदान, प्लाझ्मादान अशा उपक्रमांना प्राधान्य दिलं आहे.