Marathwada Mukti Sangram Din 2025 Messages: मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त शुभेच्छा! Quotes, Status, आणि Images द्वारे शेअर करून साजरा करा स्वातंत्र्याचा हा उत्सव

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान याला हैदराबादला एक वेगळे राष्ट्र बनवायचे होते. हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा (मराठवाडा), तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या काही भागांचा समावेश होता.

Photo Credit- File

Marathwada Liberation Day 2025: दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, पण त्यावेळी देशातील अनेक संस्थाने भारतात विलीन झाली नव्हती. त्यापैकीच एक होते हैदराबाद संस्थान. हैदराबादच्या निजामाने मराठवाड्याला तब्बल १३ महिने स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान याला हैदराबादला एक वेगळे राष्ट्र बनवायचे होते. हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा (मराठवाडा), तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या काही भागांचा समावेश होता. निजामाने लोकांना स्वातंत्र्याच्या प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी अत्याचार सुरू केले.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिसंग्रामाची मशाल पेटली

दरम्यान, स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 मध्ये महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली. हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मात्र, निजाम ऐकण्यास तयार नव्हता. अखेर भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली. या लष्करी कारवाईत निजामाचा पराभव करण्यात आला. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि मराठवाडा स्वातंत्र्य झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त Images, Wishes, Quotes, WhatsApp Status, द्वारे आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

धडक कारवाईमुळे निजाम राजवट पूर्ण झाली खिळखिळी,

गुलामगिरीचे तोडून साखळदंड स्वातंत्र झाली मराठवाडा भूमी,

जान ठेवून भूमीपूत्रांच्या त्याग बलिदानाची...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्यवीरांच्या अथक परिश्रमातून स्वातंत्र झाली जेव्हा भारत भूमी,

तेव्हा मात्र मराठवाड्यातील जनता रझाकारांच्या जुलमामुळे अश्रू ठाळत होती,

अन्याय अत्याचाराचा काळोख दाटला होता चहूबाजूंनी,

तेव्हा अनेक भूमीपूत्रांनी रक्त सांडले या मायभूमीसाठी...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठवाडा मुक्तिसंग्रामात

ज्या स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली

अशा शहीद झालेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा स्वातंत्र्याचे मांगल्य गीत गात होती भारत भूमी,

तेव्हा मात्र पारतंत्र्याचे चटके सोसत होती मराठवाडा भूमी,

सांगतात आजी-आजोबा आजही तेव्हाची परिस्थिती,

निजामाच्या गुलामगिरीने त्रस्त झालेल्या जनतेची करुण कहाणी…

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जुलमी राजवट उलथवून लावत

मराठवाड्यात स्वातंत्र्याची नवपहाट उगविण्यासाठी

ज्या शूर सेनानींनी बलिदान दिले,

त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना माझे शत शत नमन!

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठवाडा मुक्ती गाथा म्हणजे अन्यायाविरुद्धच्या लढ्याची, त्यागाची आणि स्वाभिमानाची कहाणी आहे. ही कथा केवळ इतिहासापुरती मर्यादित नसून आजही लोकशाही, समानता आणि स्वातंत्र्य या मूल्यांची जाणीव करून देते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement