Maharashtra State Diwali Bumper Lottery 2019: महाराष्ट्र दिवाळी लॉटरीचा निकाल जाहीर होणार 'या' दिवशी; पहा संपूर्ण वेळापत्रक

आता अर्जदार या तारखेला आपल्या लॉटरीचा निकाल बघू शकतील.

Representational Image/ Lottery (File Image)

'महाराष्ट्र दिवाळी बंपर ड्रॉ 2019' चा निकाल 2 ऑक्टोबर, 2019 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आता अर्जदार या तारखेला आपल्या लॉटरीचा निकाल बघू शकतील. 17 ऑक्टोबर (गुरुवार) रोजी निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली होती. लॉटरी ड्रॉच्या निकालाची घोषणा दुपारी साडेचारच्या सुमारास लॉटरी सिस्टमच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल.

जाहीर करण्यात येणाऱ्या लॉटरीच्या निकालात डीआय-डीए, डीबी, डीसी इत्यादी मालिका असलेल्या दिवाळी बंपर लॉटरी 6 सिरीज योजनेचा निकाल समाविष्ट असेल.

महाराष्ट्र दिवाळी बंपर ड्रॉ निकाल 2019 सायंकाळी जाहीर करण्यात येईल आणि सर्व अर्जदार उत्सुकतेने निकालाची वाट पाहत आहेत.

महाराष्ट्र राज्य लॉटरीचे पूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे

Lottery Schedule

दिवाळी लॉटरीची परंपरा ही खूपच पूर्वीपासून आपल्या देशात चालत आली आहे. दरवर्षी दिवाळीच्या उत्सवाच्या काही महिन्यांपूर्वी लॉटरीच्या तिकिटांची विक्री सुरू होते. आणि ही तिकिटे अगदी काहीच वेळात विकली जातात. ज्यांनी लॉटरी खरेदी केली त्यांच्यासाठी निकालाची तारीख अत्यंत अपेक्षित दिवसांपैकी एक आहे.

Diwali Gifts 2019: दीपावलीला तुमच्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी घ्या ‘हे’ खास गिफ्ट्स

महत्त्वाचे म्हणजे जागतिक मंदीचा फटका या व्यवसायाला नाही. उलट निराश झाल्याने दैवावर हवाला ठेवून नशीब अजमावण्यासाठी बरेचजण या लॉटरीचा आसरा घेतात. आणि म्हणूनच हा धंदा वाढतच आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif