Maha Shivratri 2021 Messages: महाशिवरात्री निमित्त Images, Greetings, WhatsApp Stickers द्वारे शेअर करुन द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
महाशिवरात्री निमित्त Images, Greetings, WhatsApp Stickers सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) शेअर करुन शुभेच्छा देऊ शकता.
Mahashivratri 2021 Messages: भगवान शंकराचा महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते. शिवाजी महान रात्र म्हणून महाशिवरात्र असं म्हटलं जातं. संपूर्ण भारतभर महाशिवरात्रीचा उत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातो. मात्र यंदा कोविड-19 च्या सावटामुळे अनेक शिव मंदिरांमध्ये भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. परंतु, घराच्या घरी भगवान शंकराची पूजा करुन तुम्ही महाशिवरात्र साजरी करु शकता. तसंच महाशिवरात्री निमित्त Images, Greetings, WhatsApp Stickers सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) शेअर करुन शुभेच्छा देऊ शकता.
महाशिवरात्र प्रत्येक शिवभक्तासाठी अत्यंत खास असते. या दिवशी अनेक भाविक उपवास धरतात. तर अनेकजण शिवमाहात्म वाचन, मंत्रौच्चारण, जप यात दिवस व्यथित करतात. शंकराच्या पिंडीवर पाणी-दूध यांचा अभिषेक केला जातो. शंकराला प्रिय असलेले पांढरं फुल, बेल वाहून पूजा केली जाते.
महाशिवरात्री शुभेच्छापत्रं!
WhatsApp Stickers द्वारे द्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
आजकाल सण-उत्सव यांच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp सर्रास वापरले जाते. WhatsApp Stickers द्वारे तुम्ही महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता. गुगल प्ले स्टोअरवर MahaShivratri Stickers असं सर्च करुन डाऊनलोड करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
तर यंदाच्या महाशिवरात्रीला कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळो, अशी प्रार्थना करुया. म्हणजे पुढील महाशिवरात्र आपल्याला अधिक उत्साहात साजरी करता येईल.