Maha Shivratri 2021 Date: मार्च महिन्यात 'या' तारखेला आहे महाशिवरात्री, शिवभक्तांनी आर्वजून कराव्या काही महत्त्वाच्या गोष्टी

शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला 'महाशिवरात्री' असे म्हणतात.

Mahashivratri (Photo Credits: Wikimedia Commons)

भगवान शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्री (Mahashivratri) हा दिवस फार विशेष मानला जातो. या दिवशीची भगवान शंकराची पूजा करून त्याची मनोभावे भक्ती केल्यास त्यांचे चांगले फळ मिळते असे पुराणात म्हटले. यंदा ही महाशिवरात्री 11 मार्च रोजी आली आहे. यामुळे शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसत आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी 'महाशिवरात्री' म्हणून ओळखली जाते. काही लोक या दिवसाला 'जलरात्री' देखील संबोधतात. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक असा दिवस जेव्हा शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला 'महाशिवरात्री' असे म्हणतात.

या दिवशी शिवभक्त आपल्या शिवासाठी उपवास धरतात. बेलपत्र, दूधाने त्यांचा अभिषेक करुन मुहूर्तावर हा उपवास सोडतात. धार्मिक कथांनुसार, समुद्रमंथनामध्ये भगवान शंकराने विष प्राशन केलं होतं. यामुळे त्यांचा गळा निळा पडला होता. दरम्यान विषप्राशनामुळे त्यांच्या घशामध्ये जळजळ झाली होती. त्यावेळी घशामध्ये थंडावा निर्माण व्हावा म्हणून बेलपत्र देण्यात आले होते. भगवान शंकराच्या डोक्यावर बेलापत्र ठेवल्याने थंडावा निर्माण झाला होता. त्यामुळे शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने गरीबी दूर होते आणि नशिब फळफळते. बेलाचे झाड देखील वैभवतेचे प्रतिक समजले जाते.  हेदेखील वाचा- Maha Shivratri 2020: महाशिवरात्रीला नक्की करा 'हे' पाच प्रभावी उपाय; दूर होतील समस्या, धन-संपतीमध्ये होईल वाढ

महाशिवरात्री दिवशी काय कराल?

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलाची पानं शंकराला अर्पण करायला विसरू नका. तुमच्या घरामध्ये बेलपत्रं शंकराला अर्पण करणार असाल तर त्याला घरीच ठेवा. अनेकजण बेलपत्र सुकवून घरात लॉकरमध्ये ठेवतात. किंवा पुस्तकामध्ये ठेवतात.