Holi 2020: महिलेने पुरुषाला लाठी चा मार देण्याची मुभा देते 'लट्ठमार होली'; बरसाने मधील या अनोख्या परंपरेविषयी जाणून घ्या

लाठीने खेळली जाणारी होळी ही लट्ठमार होळी म्ह्णून ओळखली जाते, या दिवशी महिला आपल्या पुरुष पार्नरच्या डोक्यात लाठीने मारताना आणि पुरुष हे ढाल घेऊन स्वतःचे रक्षण करताना दिसून येतात, लाठीच्या मारापासून वाचताना आपल्या प्रेयसी किंवा पत्नीला रंगाने भिजवणे हे टास्क देखील पुरुषांकडे असते.

Lathmar Holi (Photo Credits: Facebook)

वृंदावन (Vrindavan) आणि मथुरेत (Mathura) होळीचा (Holi) उत्साह बघण्यासारखा असतो हे वाक्य तर आपण अनेकदा ऐकलं असेल, पण असं काय वेगळं याठिकाणी घडतं हे आज आपण जाणून घेणार आहोत, या भागांमध्ये होळीच्या पंधरा दिवस आधीपासूनच सेलिब्रेशनला सुरुवात होते, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रूपात होळी साजरी केली जाते, मग कधी एकमेकांवर फुल उधळून  कधी पाणी, कधी रंग, कधी लाडू तर कधी चक्क लाठी ने मारून होळी साजरी करण्याची या भागात एक परंपराच आहे. यातील लाठीने खेळली जाणारी होळी ही लट्ठमार होळी (Lathmar Holi) म्ह्णून ओळखली जाते, या दिवशी महिला आपल्या पुरुष पार्नरच्या डोक्यात लाठीने मारताना आणि पुरुष हे ढाल घेऊन स्वतःचे रक्षण करताना दिसून येतात, लाठीच्या मारापासून वाचताना आपल्या प्रेयसी किंवा पत्नीला रंगाने भिजवणे हे टास्क देखील पुरुषांकडे असते. या प्रकारची होळी ही नंदगाव (Nandgaon)  आणि बरसाना (Barsana)  या भागात खास साजरी केली जाते.

जर का तुम्ही अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा टॉयलेट- एक प्रेमकथा (Toilet- Ek Premkatha) सिनेमा पहिला असेल तर त्यात तुम्हाला या होळीची छोटीशी झलक पाहायला मिळते. यामागील कथा आता आपण जाणून घेऊयात..

बरसाने येथील लट्ठमार होळी

बरसाने हे श्रीकृष्णाची प्रेयसी राधेचं जन्मस्थळ आहे, जेव्हा कान्हा राधेला भेटायला आला होता तेव्हा त्यांनी याठिकाणी एकमेकांवर रंग उधळण्याचा खेळ खेळला होता,हा प्रसंग पुढे परंपरेत रूपांतरित झाला. असं म्हणतात, की रंग लावून कृष्ण सतावत असतामा राधा त्याला प्रेमाने लाठी मारून शिक्षा द्यायची हीच पद्धत आता लट्ठमार होळीच्या रूपात साजरी केली जाते. अर्थात बरसाने मधून या परंपरेचा उगम झाल्याने त्याठिकाणची होळी ही अगदीच धुमधडाक्यात पार पडते. असं म्हणतात की हा खेळ खेळताना ही लाठी लागली तरी कोणाला दुखापत होत नाही किंबहुना एखाद प्रसंगी दुखापत झाली तरी माती लावून पुन्हा हा खेळ सुरु होतो.Shimga Festival 2020: शिमगोत्सव निमित्त कोकणात दशावतार, जाखाडी नृत्य ते ग्रामदैवतेची पालखी नाचवणं असा असतो होळी सणाचा उत्साह!

लट्ठमार होळी सेलिब्रेशन

ही होळी जितकी युनिक आहे तितकीच तिच्या सेलिब्रशनची पद्धत सुद्धा वेगळी आहे. यावेळी पुरुष पारंपरिक गवळ्याच्या पोशाखात तयार होतात डोक्याला सुद्धा अशाच पद्धतीचा फेटा बांधलेला असतो. आणि थोडीशी मऊसर अशी कापडाची ढाल त्यांच्याकडे असते, तर महिला सुद्धा साजशृंगार करून तयार होतात. हे सेलिब्रेशन मोठ्या मैदानात सर्वांच्या समोर होते.

दरम्यान, अजूनही काही भागात जिथे महिला पुरुष असा भेद पाळला जातो तिथे लट्ठमार होळीची विशेष भूमिका आहे. ज्याप्रमाणे राधा कृष्णाला त्याने दिलेल्या त्रासाची शिक्षा द्यायची तश्याच आताही महिला आपल्या पती ला किंवा प्रियकराला या दिवसाच्या निमित्ताने प्रेमळ शिक्षा देऊ शकतात.