Ganpati Invitation 2020 Marathi Messages Format: बाप्पाच्या दर्शनाला सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत निमंत्रण देण्यासाठी खास आमंत्रण पत्रिका

Ganesh Chaturthi Invitation | File Photo

Ganesh Chaturthi 2020 E-Invitation Cards For Virtual Celebrations: यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रामध्ये विघ्नहर्ता गणरायाचं आगमन  गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) म्हणजे   22 ऑगस्ट, शनिवार दिवशी होणार आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सवाची धामधूम, गर्दी, उत्साह नसला तरीही घराघरात तितक्याच श्रद्धेने गणरायाचं आगमन होणार आहे. मुंबई सह महाराष्ट्रात अजूनही कोरोना व्हायरसचं सावट दूर झालेले नसल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळत आणि व्हर्च्युअल जगातच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. 22 ऑगस्टला गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तो किमान दीड दिवस ते 5, 7, 10 दिवस घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होणार आहे. मग यंदा तुमच्या गणरायाच्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी कोरोना संकटामुळे तुमच्या घरी येणं शक्य नसलं तरीही सोशल मीडीयामध्ये गुगल मीट(Google Meet), युट्युब लाईव्ह (YouTube Live), व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल (WhatsApp Video Call), झूम (Zoom) सह अनेक पर्यायांचा वापर करून घरबसल्या बाप्पाचं दर्शन उपलब्ध करून देता येऊ शकतं. मग यंदा व्हर्च्युअल गणेशोत्सवाच्या (Virtual Ganeshotsav)  निमंत्रण पत्रिका तुमच्या मित्रांना, प्रियजनांना, कुटूंबातील नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, SMS च्या माध्यमातून पाठवून तुमच्या घरातील गणेशोत्सवामध्ये सहभागी करून घेऊन शकता. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये आता आमंत्रण पत्रिका पाठवण्याचं काम तुमचं थोडं काम आम्ही हलकं करतो आणि त्यासाठी तयार केलेल्या या व्हर्च्युअल गणेशोत्सवच्या निमंत्रण पत्रिका तुम्ही शेअर करू शकता.

महाराष्ट्रासह जगभरात यंदा 22 ते 27 ऑगस्ट दरम्यान गणपती-गौरींचा घरागुती गणेशोत्सव सोहळा पार पडेल. तर अनंत चतुर्दशी पर्यंत 10 दिवसांचा चालणारा गणेशोत्सव सोहळा 1 सप्टेंबर पर्यंत असेल. या दिवसांत अनावश्यक गर्दी टाळा, मोजक्याच लोकांमध्ये, साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणं यामध्येच सार्‍यांचं हित असल्याने गणेशोत्सवासाठी प्रत्येकाला जातीने हजेरी लावण्याचा हट्ट यंदा सोडा आणि या व्हच्युअल आमंत्रण पत्रिका शेअर करून त्यांना तुमच्या आनंदामध्ये सहभागी करून घ्या.

गणेश चतुर्थी 2020 आमंत्रण पत्रिका

नमुना 1:

ॐ श्री गणेशाय नम:॥

कोरोनाचं संकट घेऊन जाया विलया

गणरायाकडे प्रार्थना करत भक्तीभावाने म्हणूया बाप्पा मोरया

लॉकडाऊनच्या नियमांत घरीच राहूया

सोशल डिस्टन्सिंग पाळत गणरायाचं दर्शन घरूनच घेऊया!

22 ऑगस्ट सकाळी 8 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा

आरतीची वेळ - दुपारी 12 आणि रात्री 7.30 वाजता

दर्शनासाठी या लिंकवर क्लिक करा-

आपला नम्र,

Ganesh Chaturthi Invitation | File Photo

नमुना 2:

आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थीला शनिवार, दि.22/8/2020 ते गुरूवार दि.27/8/2020 रोजी गणराय विराजमान आहेत. तरी आपण आपल्या परिवारासह  ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा.

आपले नम्र,

वेळ:

दर्शनाची लिंक-

 

Ganesh Chaturthi Invitation | File Photo

नमुना 3:

*llश्री* *गणेशाय* *नम:ll*

सालाबादा प्रमाणे यंदाही "बाप्पा"चे 10 दिवसाचे वास्तव्य आमचे घरी दि. 27-8-2020 ते 1-9-2020 पर्यंत आहे. तरी या मंगल प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन यंदा ऑनलाईन घेण्यासाठी  यावे ही नम्र विनंती.

लिंक:

*आम्ही आपली वाट पाहत आहोत*

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये यंदा कोरोना संकटामुळे कंटेन्मेंट झोन मध्ये असणार्‍या भागातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळातही ये-जा करता येणार नाही. त्यांच्यासाठी विसर्जनाची सोय देखील त्यांच्यांच भागात फिरत्या कृत्रिम तलावांच्या मदतीने केली जाणार आहे. मग यंदा गणेशोत्सवानिमित्त मित्र मैत्रिणींपासून ते अगदी घरातील नातलगांकडेही जाण्याचा हट्ट थोडा कमी करा आणि व्हर्च्युअली जगात गणरायाचं दर्शन घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायला प्रशासनाला, आरोग्य यंत्रणांना मदत करा.