International Day of the Girl Child HD Images: आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून देऊन स्पेशल करा प्रत्येक मुलीचा आजचा दिवस!
त्यासाठी खास शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स, एसएमएस, मेसेजेस....
International Day of the Girl Child HD Images & Wallpapers: आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. युनाडेट नेशन्सने घोषित केलेला गर्ल चाईल्ड डे किंवा द डे ऑफ गर्ल्स हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जोता. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 2020 हा माय व्हाईस, अवर ईक्वल फ्युचर या थीमवर आधारीत साजरा केला जाणार आहे. महिलांसोबत होणारा भेदभाव, अत्याचार आणि शिक्षणाच्या कमी संधी या गोष्टींचा या थीममध्ये अंतर्भाव असणार आहे. सध्याच्या काळात या बाबींबद्दल समाजामध्ये जागृकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. डिजिटल युगात बालिका दिनानिमित्त सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छापत्रं शेअर करुन तुम्ही प्रत्येक मुलीचा दिवस स्पेशल करु शकता. बालिका दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स (Greetings), एसएमएस (SMS), मेसेजेस (Messages) तुम्ही WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून शेअर करु शकता.
बालिका दिन वेगळा साजरा करण्याची गरज काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. जगभरातील बहुतांश मुलींना दबाव आणि भीतीदायक वातावरणात जगावे लागत आहे. अनेक मुली शिक्षण, पौष्टीक आहार, अधिकारी, वैद्यकीय गरज यांपासून वंचित आहेत. महिलांवरील हा अन्याय, भेदभाव दूर करण्यासाठी एका विशिष्ट दिवसाची गरज आहे. ज्यामुळे आपण या गोष्टींबाबत जनजागृती करु शकतो.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा:
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. बालिका दिनाच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन ‘International Day of the Girl Child’ चे स्टिकर्स डाऊनलोड करुन तुमच्या परिवारातील, परिचयातील मुलींना पाठवा.
सध्याची आजूबाजूची परिस्थिती पाहाता मुलींना शिक्षण, आरोग्य, अधिकार, हक्क, समान वागणूक, आदर यासोबत सुरक्षित वातावरण मिळण्याचीही गरज आहे. लेटेस्टली मराठीकडून आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!