Independece Day 2019: स्वातंत्र्य दिनी तिरंग्याच्या ढंगातल्या 'या' हटके रेसिपीज नक्की करून पहा (Watch Video)

या दिवशी झेंडावंदनच्या कार्यक्रमणानंतर अनेक ठिकाणी मोठमोठ्या मेजवान्यांचे आयोजन केले जाते. यंदा पार्टीच्या जुन्यापुराण्या रेसिपीज ना थोडा हटके ट्विस्ट देऊन तुम्ही तिरंगी ढंगातील हे पदार्थ नक्की ट्रे करून पहा..

Tri Colour Recipes (Photo Credits: Youtube)

उद्या, म्हणजेच 15 ऑगस्टला भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day)  देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी अनेक सोसायटी व परिसरात सोहळ्याचे आयोजन केलेले असते. सकाळी झेंडा वंदनाचा मुख्य कार्यक्रम उरकल्यावर अनेकांना सुट्टी असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम ठरवले जातात. खरंतर अशाप्रकारे सर्वजण एकत्र येण्याचं औचित्य असलं की एखादी तरी मेजवानी ठरलेलीच असते. पण यामध्ये नेहमीचेच पदार्थ ऑर्डर केल्यास काही गंमत उरत नाही. त्याऐवजी यंदा काहीतरी हटके करून तुम्ही स्वातंत्र्य दिन विशेष थीमची मेजवानी बनवू शकता.

यामध्ये खरंतर तुम्हाला विशेष वेगळी मेहनत घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही, उलट आपल्या पारंपरिक पार्टी पदार्थांनाच तुम्ही एक ट्विस्ट देऊन तुमच्या पाककौशल्यासाठी सर्वांकडून कौतुक मिळवू शकता.. मग वाट कसली पाहताय.. चला तर मग एक नजर टाकुयात यंदाच्या स्वातंत्र्य दिन विशेष मेजवानी मेन्यूवर..

पहा खास तिरंगी रेसिपीज

तिरंगी पुलाव

तिरंगी डोसा

तिरंगी ढोकळा

तिरंगी सँडविच

तिरंगी इडली

तिरंगी स्मूदी

तिरंगी करंजी

15 ऑगस्ट हा आपल्या राष्ट्रीय उत्सवांपैकी सर्वात महत्वाचा दिवस आहे, त्यामुळे हा दिवस साजरा करणे ही आपली अभिमानस्पद परंपरा आहे. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा प्रश्न परंपरेचा येतो तेव्हा खाणं आणि खाऊ घालणं ही तर भारतीयांची मूलभूत ओळख मानली जाते. ही ओळख सिद्ध करण्यासाठी यंदा या हटके रेसिपीज नक्की ट्राय करून पहा.. आणि आम्हाला कळवा. तूर्तास तुम्हाला स्वतंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!