Hartalika 2024 Wishes In Marathi: हरितालिका व्रताच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर देत करा दिवसाची मंगलमय सुरूवात

हरितालिकेचं व्रत हे माता पार्वतीने देखील भगवान शंकर यांना प्रसन्न करून त्यांच्याशी विवाहबद्ध होण्यासाठी केलं होतं.

Haritalika | File Image

गणेशोत्सवामध्ये घरोघरी बाप्पाचं आगमन होण्याच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत (Hartalika Vrat)  पाळले जाते. भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस हा हरितालिका व्रताचा दिवस आहे. कुमारिकांना मनाजोगा पती मिळावा आणि सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरितालिकेचं व्रत करतात. यंदा हे हरितालिका व्रत 6 सप्टेंबरला आहे. भगवान शंकर आणि उमा च्या रूपात माता पार्वतीची आराधना करण्यासाठी हे हरितालिकेचं व्रत केलं जातं. मग आज तुमच्या घरातील स्त्रिया, मुलींना, मैत्रिणींना हरितालिका व्रताच्या शुभेच्छा ही खास शुभेच्छापत्र शेअर करून त्यांच्या दिवसाची सुरूवात प्रसन्न वातावरणामध्ये करा.

हरितालिका व्रताच्या दिवशी उपासकरी महिला, मुली निर्जळी व्रत करून भगवान शंकराची उपासना करतात. पुराणातील कहाण्यांनुसार, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री दिवशी ज्यांनी शंकराची उपासना केली नसेल त्यांना या एका दिवसाच्या व्रताने ते पुण्य मिळू शकते अशी धारणा आहे. नक्की वाचा: Hartalika Teej 2024 Muhurta: हरतालिका तीज कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त.  

हरितालिका व्रताच्या शुभेच्छा

तुमच्या  आयुष्यात यावा शंकरासमान पती,
त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी
हरितालिकेच्या  शुभेच्छा

नाते अतूट, जगती सात पावलांचे
अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे
हरितालिकेच्या  शुभेच्छा

सण सौभाग्याचा, पतीवरील प्रेमाचा,
तुमच्या सौभाग्याला,
अक्षय आनंदासह दिर्घायुष्य लाभो..
हरितालिकेच्या  शुभेच्छा

शिव व्हावे प्रसन्न
पार्वतीने द्यावे सौभाग्यदान!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर
अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर!
हरितालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रात हे हरितालिका व्रत म्हणून ओळखलं जातं तर दक्षिण भारतामध्ये गौरी हब्बा म्हणून हरितालिका साजरी केली जाते. प्रत्येक प्रांतानुसार हरितालिका व्रताचे वेगवेगळे नियम आणि रीती आहेत. हरितालिकेचं व्रत हे माता पार्वतीने देखील भगवान शंकर यांना प्रसन्न करून त्यांच्याशी विवाहबद्ध होण्यासाठी केलं होतं.