Happy New Year 2020 Quotes: नवीन वर्षाकडे सकारत्मक दृष्टीने बघण्यासाठी प्रेरणा देतील हे काही खास मराठी विचार
या वर्षाकडे सकारत्मक दृष्टीने पाहण्यासाठी आणखीन प्रोत्साहन मिळावे याकरिता आम्ही आज आपल्यासोबत काही खास विचार शेअर करत आहोत.
Happy New Year 2020 Marathi Quotes : 2019 च्या वर्षाला अलविदा म्हणत नवीन वर्षाचे म्हणजेच 2020 चे स्वागत करण्यासाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. या नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी आज आपणही एखाद्या पार्टीचा प्लॅन केला असेल, आणि अर्थात एका नव्या सुरुवाती आधी एन्जॉय करना तो बनता है ना बॉस! पण हे नववर्षाचे (New Year) स्वागत म्हणजे केवळ सेलिब्रेशन पुरते मर्यादित नसून हा जुन्याकडून नव्याकडे नेणारा एका खास प्रवास असतो. एक वर्ष मागे सरून पुढे जाताना अनेक आठवणी, अनेक किस्से, काही नव्या इच्छा, काही अपेक्षा सारं काही मनात घेऊन हा प्रवास पूर्ण केला जातो. आपल्यापैकी देखील अनेकांसाठी येणारे वर्ष काही ना काही कारणाने खास असू शकेल. या वर्षाकडे सकारत्मक दृष्टीने पाहण्यासाठी आणखीन प्रोत्साहन मिळावे याकरिता आम्ही आज आपल्यासोबत काही खास विचार शेअर करत आहोत.
हे विचार आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रणी, नातेवाईक व अन्य जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करता यावेत याची देखील आम्ही काळजी घेतली आहे. शुभेच्छारुपी हे विचार तुम्ही फ्री मध्ये डाउनलोड करून तुमच्या Whatsapp Status , सोशल मीडिया किंवा अन्य प्लॅटफॉर्मवरून शेअर करू शकता. चला तर पाहुयात नव्या वर्षानिमित्त स्पेशल प्रेरणादायी विचार..
1) आजची पहाट घेऊन आली नवे वर्ष नवीन आशा
या वर्षात तुमच्या भविष्याला मिळूदे तुमच्या मनासारखी दिशा
2) नव्या वर्षात सारे मिळून करू संकल्प साधा सोप्पा
स्वतःसोबतच इतरांसाठी मनात तयार करू छोटासा कप्पा
3) सरत्या वर्षाला निरोप देताना
आठवणींचे फुले वेचून घे..
सुख, दुःख मनात साठवून घे..
नवीन वर्षाला भेटत असताना
हे सारे काही आकाशी उधळून
नव्या आशा मनी भरून घे..
4) ध्येयावर लक्ष केंद्रित करून चालणारी व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते
तुमचे ध्येय पूर्ण होवो हीच आमची सदिच्छा
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
5) काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल
या नव्या वर्षात येणाऱ्या बदलांना सकारात्मकतेने स्वीकारण्यासाठी
ऑल द बेस्ट !
असं म्हणतात, की एखाद्या व्यक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी क्षमतेपेक्षाही इच्छा आणि जिद्द अधिक महत्वाचे असते. याच दोन गोष्टींनी भरलेले हे विचार तुमच्यासाठी नक्की प्रेरणादायी ठरतील. येणारे हे नवे वर्ष तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे ठरोयासाठी लेटेस्टली परिवाराकडून खूप खूप सदिच्छा! .. हॅप्पी न्यू इयर.. !