Happy Makar Sankranti 2023 Wishes in Marathi: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी WhatsApp Status, Messages द्वारा शेअर करून साजरा करा सण
आभाळात अनेक रंगांचे, आकाराचे पतंग उडत असतात. सोबतच गोडाधोडाचे पदार्थ असतात.
ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार नव्या वर्षामध्ये पहिला सण हा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) असतो. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तो दिवस मकरसंक्रांत म्हणून साजरी केली जातो. या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तीळगूळ, गूळपोळी, तेलपोळीचा आस्वाद घेतला जातो. मग या सणाचा आनंद तुमच्या प्रियजणांसोबत, नातेवाईकांसोबत, आप्तेष्टांसोबत साजरा करण्यासाठी सोशल मीडीयामध्ये खास मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स, मराठमोळी शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, HD Images शेअर करून हा दिवस साजरा करू शकता.
मकर संक्रांती ऋतूमानानुसार होणारे बदल आपल्या लक्षात आणून देते. आहारात, पर्यावरणामध्ये होणारे बदल दिसून येतात. शेतात आलेले नवं आणि ताजं पीक, अन्नधान्य या सणाच्या निमित्ताने आपल्या ताटात येतं. हवेत वाढलेला गारवा सुसह्य करण्यासाठी आहारात स्निग्धजन्य पदार्थ वाढवले जातात त्यामुळे तीळ, गूळ, शेंगदाणा, बाजरी यांचा अधिक समावेश असतो. 0 त्याचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण संध्याकाळी मोकळ्या जागी गर्दी करतात. मग असा हा चैतन्याचा, आनंदाचा दिवस सोशल मीडीयात साजरा करण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्रं नक्की शेअर करा. नक्की वाचा: Makar Sankranti Haldi Kunku Invitation Format in Marathi: मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभासाठी 'निमंत्रण पत्रिका' WhatsApp, SMS द्वारा शेअर करत सख्यांना द्या आमंत्रण .
मकरसंक्रातीच्या शुभेच्छा
मकर संक्रमणाच्या तारखेमध्ये आता बदल दिसून येत आहे. सामान्यपणे सूर्य मकर राशीत येतो तो दिवस मकरसंक्रांतीचा असतो. पूर्वी सहज 14 जानेवारीला मकर संक्रांत येते असं म्हटलं जात होतं पण आता ती तारीख जसा काळ लोटेल तशी पुढे सरकत जाणार आहे. मकर संक्रांत आणि उत्तरायणामध्येही आता 22 दिवसांचा फरक दिसून येत आहे.