Happy Gudi Padwa 2023 Messages: गुढी पाडव्यानिमित्त Wishes, Greetings, Images, SMS, WhatsApp Status च्या माध्यमातून मित्र-परिवारास द्या मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा!

यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Happy Gudi Padwa 2023 Messages (PC - File Image)

Happy Gudi Padwa 2023 Messages: गुढी पाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या सणाला अत्यंत महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढी पाडव्याचा सण साजरा केला जातो. यंदा 22 मार्च रोजी गुढी पाडवा साजरा करण्यात येईल. गुढीपाडव्याला मालमत्ता किंवा नवीन घर खरेदी करणे शुभ मानले जाते. गुढीपाडवा, मराठी नववर्ष, लोकांसाठी नवीन सुरुवात आणि आशेची भावना घेऊन येतो.

प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात हा सण मोठा उत्सवात साजरा केला जातो. गुढीपाडव्यानिमित्त लोक आपल्या मित्र-परिवारास मराठी नुतन वर्षाच्या शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील गुढी पाडव्यानिमित्त Wishes, Greetings, Images, SMS, WhatsApp Status च्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Gudi Padwa 2023 Rangoli Designs: गुढीपाडव्याला काढता येतील अशा सुंदर आणि हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ)

वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2023 Messages (PC - File Image)

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी

नव्या वर्षाची सुरुवात…

गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2023 Messages (PC - File Image)

नूतन वर्ष आणि गुढी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा

हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी,

निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो

हीच ईश्वर चरणी प्रार्थना

Happy Gudi Padwa 2023 Messages (PC - File Image)

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2023 Messages (PC - File Image)

आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2023 Messages (PC - File Image)

प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…

Happy Gudi Padwa 2023 Messages (PC - File Image)

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. असं म्हटलं जात की, घरामध्ये गुढी उभारल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि जीवन समृद्ध होते. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील दर्शवितो. या दिवशी सोने किंवा नवीन कार खरेदी करणे शुभ मानतात.