Happy Gatari 2020 Messages: गटारी च्या शुभेच्छा देणारे मजेशीर मराठी संदेश, Wishes, Whatsapp Status वर शेअर करून मांसाहारी व मद्यप्रेमींना करा खुश
या निमित्ताने मराठमोळी आणि मजेशीर गटारी विशेष शुभेच्छापत्र फ्री मध्ये डाउनलोड करून तुम्ही शेअर करू शकता.
Gatari 2020 Marathi Messages: महाराष्ट्रात पुढील सोमवारी म्हणजेच 20 जुलै पासून श्रावण मास सुरु होत आहे. श्रावणात मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य केले जाते, अनेक घरात तर कांदे लसूण सुद्धा जेवणात समाविष्ट केले जात नाहीत. हिंदुधर्मीयांसाठी हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. यंदा 20 जुलै दिवशी आषाढी अमावस्या (Aashadh Amavasya) असल्याने 19 जुलै, रविवार दिवशी गटारी म्हणजेच मांसाहारींना मासे, चिकन, मटण यांच्यावर ताव मारण्यासाठी अखेरची संधी आहे. तुमच्यापैकी हौशी मंडळींनी तर आज शुक्रवार पासूनच हे सेलिब्रेशन सुरु केले असेल हो ना? या सेलिब्रेशनला आणखीन रंगत आणण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारला, भावंडांना शुभेच्छा देऊ शकता. अर्थात सेलिब्रेशन घरातच असलं तरी शुभेच्छा सोशल मीडिया म्हणजेच Whatsapp Status, Facebook वरून सर्वांपर्यंत पोहचवू शकता. या शुभेच्छा सुद्धा तुम्हाला शोधायला लागू नयेत याची सोय आम्ही केली आहे. खाली दिलेली मराठमोळी आणि मजेशीर गटारी विशेष शुभेच्छापत्र फ्री मध्ये डाउनलोड करून तुम्ही शेअर करू शकता.
गटारी 2020 मराठी शुभेच्छा
1) संपली नुकतीच आषाढी वारी
आता येणार बाप्पांची स्वारी
दिवाळी, दसरा मागोमाग सणांची बारी
थोडेच दिवस आहे हातात
त्याआधी जोशात साजरी करू गटारी
गटारी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा
2) सुकी मच्छी, मटणाचा रस्सा
सगळं घेऊन यंदा घरीच बसा
गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
3) खास तुमच्यासाठी गटारी विशेष जेवण पाठवत आहोत
प्रिंट काढून खाऊन घ्या..
गटारी च्या खूप शुभेच्छा
4) चिकन, मटण, मच्छी, सगळा बेत करा खास
दारू कशाला हवी एवढाच बेत बास
गटारी च्या मनःपूर्वक शुभेच्छा
5) ओकू नका मातु नका
मटणावर ताव मारू नका
फुकट मिळतेय म्हणून ढोसू नका
झिंगून गटारात लोळू नका
गटारीच्या क्वार्टरभर शुभेच्छा
गटारीच्या निमित्ताने अनेक जण श्रावण महिन्याची सुरूवात होण्यापूर्वी कुटुंबासोबत, मित्रपरिवारासोबत धम्माल मस्ती करत पावसाळी वातावरणाची मज्जा लुटली जाते. अनेक जण चातुर्मास देखील पाळतात त्यामुळे श्रावण, पाठोपाठ गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचं मंगल पर्व पार पडल्यानंतर पुन्हा मांसाहार खाण्याची संधी मिळते. तोपर्यंतची कसर आता गटारी दणक्यात साजरी करून भरून काढा.