Happy Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Facebook Messages द्वारा देत साजरा करा सोहळा आनंदाचा

यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या जवळच्या व्यक्तींना मनापासून शुभेच्छा देऊन हा सण अधिक आनंदाने साजरा करूया. मग त्यासाठी या मराठमोळ्या शुभेच्छा WhatsApp, Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

Happy Ganesh Chaturthi 2026

Ganesh Chaturthi 2026 Wishes In Marathi: गणपती बाप्पा हे बुद्धी, विवेक आणि यशाचे प्रतीक मानले जातात. कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात करताना प्रथम गणेशाचे स्मरण केले जाते, कारण तो सर्व विघ्नांचा नाश करणारा देव आहे. गणेश चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करण्याची रीत आहे. पार्थिव गणेश पूजन म्हणजे मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची पूजा करणे. मातीची मूर्ती नैसर्गिक असते आणि विसर्जनानंतर ती पुन्हा निसर्गात विलीन होते. मग अशा या मंगलमय गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी घरी बाप्पाचं आगमन करताना तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत WhatsApp Status, Facebook Messages, Instagram Post शेअर करत या सणाचा आनंद द्विगुणित करा.

गणेश चतुर्थी यंदा 14 सप्टेंबरला आहे. या दिवशी घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. पुढे रीतीनुसार किमान दीड ते दहा दिवस बाप्पाची नियमित पूजा केली जाणार आहे. यंदा सार्वजनिक गणपती बारा दिवस साजरा केला जाणार आहे. नक्की वाचा: Ganesh Utsav 2026: कोकणात गणेशोत्सवात दिसणारी 'माटी' म्हणजे काय? कोणकोणत्या गोष्टी बांधतात घ्या जाणून.

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

1.
मंगलमूर्ती आली घरा, सुखाचा वर्षाव करी सारा,
विघ्न हरो, आनंद फुलो, गणराया देई आशिर्वाद खरा,
दूर्वा-मोदकांचा नैवेद्य गोड, भक्तीभावे अर्पण करा,
गणपती बाप्पा मोरया, तुझा जयजयकार असो सदा।
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

Ganesh Chaturthi Wishes

2.
दूर्वांकुराने सजली मूर्ती, मोदकांचा नैवेद्य गोड,
बाप्पा तुझ्या चरणी वंदन, दे आम्हा सुखाची जोड,
अष्टविनायका, विघ्नहर्ता, तुझी कृपा असो थोर,
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

Ganesh Chaturthi Wishes

 3.
सिद्धिविनायका, बुद्धिदात्या, तुझ्या चरणी नमन,
ज्ञान-विवेकाचा दीप उजळो, मिटो अज्ञानाचे तम,
घरोघरी नांदो चैतन्य, फुलो प्रत्येकाचे मन,
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !

Ganesh Chaturthi Wishes

4.
ढोल-ताशांच्या गजरात, मोरया चा नाद घुमे,
बाप्पा तुझ्या आगमनाने, मन प्रत्येकाचे झुमे,
उत्साहाचा सण आला, रंगला अंगण सारे,
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, आनंदाने भरो घरे।

 

Ganesh Chaturthi Wishes

गणेश चतुर्थी हा सण केवळ धार्मिक उत्सव नसून तो एकत्रितपणा, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे.गणेश चतुर्थी हा सण आनंद, श्रद्धा आणि एकत्रितपणाचा संदेश देतो. योग्य शब्दांत दिलेल्या शुभेच्छा नात्यांमधील ओलावा वाढवतात आणि सणाचा आनंद द्विगुणित करतात. यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या जवळच्या व्यक्तींना मनापासून शुभेच्छा देऊन हा सण अधिक आनंदाने साजरा करूया.

Share Now

Tags

Ganesh Chaturthi Ganesh Chaturthi images Ganesh Chaturthi Messages Ganesh Chaturthi Shubhechha Ganesh Chaturthi Whatsapp Status Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi Wishes in Marathi Ganeshotsav Ganeshotsav Wishes Ganpati Bappa Morya Happy Ganesh Chaturthi Happy Ganesh Chaturthi Greetings Happy Ganesh Chaturthi Images Happy Ganesh Chaturthi Marathi Wishes Happy Ganesh Chaturthi Messages Happy Ganesh Chaturthi Photos Happy Ganesh Chaturthi Wallpapers Happy Ganesh Chaturthi Wishes गणपती बाप्पा मोरया गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी मराठी मेसेजेस गणेश चतुर्थी मराठी विशेस गणेश चतुर्थी मराठी शुभेच्छा गणेश चतुर्थी मेसेजेस गणेश चतुर्थी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस गणेश चतुर्थी शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सव गणेशोत्सव शुभेच्छा गणेशोत्सवाच्या मराठी शुभेच्छा सण आणि उत्सव हॅप्पी गणेश चतुर्थी हॅप्पी गणेशोत्सव Happy Ganesh Chaturthi 2026 Happy Ganesh Chaturthi in Marathi गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा गणेश चतुर्थी 2026
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement