Happy Doctors Day 2022 HD Images: 'डॉक्टर्स डे' निमित्त शेअर करा खास Wishes, Messages, Greetings, WhatsApp Status; माना तुमच्या आयुष्यातील डॉक्टरांचे आभार
या वर्षी म्हणजेच 2022 साठी राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम 'फॅमिली डॉक्टर्स ऑन द फ्रंट लाइन' अशी ठेवण्यात आली आहे.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत ‘डॉक्टर’ त्याच्यासोबत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची असते. भारतामध्ये तर डॉक्टरांना देवाचे रूप मानले जाते आणि म्हणूनच आपण आपल्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी डॉक्टरांवर सोपवलेली असते. हेच डॉक्टर आपल्याला अनेक रोगांपासून, आजारापासून वाचवून निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. डॉक्टरांची ही सेवाभावना, त्यांचे कार्य यांचा गौरव करण्यासाठी भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ (National Doctors' Day 2022) साजरा केला जातो. डॉक्टरांचे आभार मानण्याचा हा दिवस आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन दरवर्षी देशात राष्ट्रीय वैद्यकीय दिन कार्यक्रम आयोजित करते. ज्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. त्यांचे नाव होते डॉ बिधान चंद्र रॉय (Dr. B.C. Roy). भारतात प्रथम 1991 साली ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली.
तर या खास दिवशी डॉक्टर्स डे निमित्त Wishes, Messages, Images, Greetings शेअर करून माना तुमच्या आयुष्यातील डॉक्टरांचे आभार.
दरम्यान, डॉ.बिधान चंद्र राय हे बंगालचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते एक वैद्य देखील होते आणि त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान होते. जाधवपूर टीबी मेडिकल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेत डॉ.बिधानचंद्र रॉय यांचा मोलाचा वाटा होता. भारतीय उपखंडातील पहिले वैद्यकीय सल्लागार म्हणून ते प्रसिद्ध होते. 4 फेब्रुवारी 1961 रोजी डॉ.बिधानचंद्र रॉय यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या मानवतेच्या सेवेतील अभूतपूर्व योगदानाची दखल घेण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
1 जुलै 1882 रोजी डॉ.बिधानचंद्र रॉय यांचा जन्म झाला होता आणि 1 जुलै 1962 रोजी डॉ.बिधान यांचे निधन झाले. देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या थीमवर डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या वर्षी म्हणजेच 2022 साठी राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम 'फॅमिली डॉक्टर्स ऑन द फ्रंट लाइन' अशी ठेवण्यात आली आहे.