Govatsa Dwadashi 2022 Rangoli Designs: गोवत्स द्वादशीच्या शुभ प्रसंगी काढा सुंदर आणि हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ

वसुबारसनिमित्त घरासमोर रांगोळी काढली जाते. वसुबारसनिमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी डिझाईन व्हिडीओ घेऊन आलो आहोत, चला तर मग, पाहूया

Govatsa Dwadashi 2022 Rangoli Designs: गोवत्स द्वादशीपासून दिवाळी सणाची सुरवात होते, महाराष्ट्र राज्यात हा सण वसु बारस ओळखला जातो. वसु बारसला  विवाहित स्त्रिया उपवास करतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी श्री कृष्ण पूजनासह गौ पूजन करतात. गुजरातमध्ये हा सण वाघ बारस म्हणून साजरा केला जातो. गो वसुबारस वत्स द्वादशी हा आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील बाराव्या दिवशी म्हणजे द्वादशीला साजरा केला जातो. गोवत्स द्वादशी 2022 शुक्रवार, 21 ऑक्टोबर रोजी येते. पवित्र सणाच्या दिवशी गायीची पूजा करतात, हिंदू धर्मात गायीला खूप महत्व आहे. वसुबारसनिमित्त घरासमोर  रांगोळी काढली जाते. प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी काढली जाते. वसुबारसनिमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी डिझाईन व्हिडीओ घेऊन आलो आहोत. 

पाहा व्हिडीओ 

वसुबारसनंतर खऱ्या अर्थाने दिवाळी या वर्षातील सर्वात मोठ्या सणाला सुरवात होते. या शुभ प्रसंगी दिवाळीचे 5 दिवस काढता येतील असे सुंदर डिझाईनचे व्हिडीओ आम्ही पोस्ट करणार आहोत, दरम्यान, तुम्ही व्हिडीओ पाहून घरासमोर सुंदर रांगोळी काढू शकता.