Gandhi Jayanti 2023 Quotes: महात्मा गांधी जयंती Messages, Whatsapp Status, SMS, Wishes शेअर करून करा बापूच्या स्मृतीस त्रिवार वंदन!

गांधी जयंती निमित्त तुम्ही सोशल मीडियावर Gandhi Jayanti Messages, Gandhi Jayanti Quotes, Gandhi Jayanti Images, Gandhi Jayanti Whatsapp Status पाठवून आपल्या मित्र-परिवारास गांधी जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Gandhi Jayanti 2023 Quotes (PC - File Image)

Gandhi Jayanti 2023 Quotes: गांधी जयंती भारतात दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. गांधी जयंतीचा दिवस देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. संपूर्ण भारतामध्ये, गांधीजींना राष्ट्रपिता आणि बापूंचा दर्जा देण्यात आला आहे. आणि त्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गांधीजींनी दिलेले धडे लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांचे पालन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गांधीजी हे अहिंसावादी होते. त्यांना सत्याच्या मार्गावर चालणे आवडायचे. कारण या मार्गावर उशिरा का होईना यश नक्कीच मिळते.

महात्मा गांधींच्या संघर्ष आणि कार्याच्या कथा प्रत्येकाने ऐकल्या आहेत. दरवर्षी देशभरात 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते. म्हणूनचं संपूर्ण जग 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करते. गांधीजींना लोक प्रेमाने बापू, राष्ट्रपिता म्हणत असतं. गांधी जयंती निमित्त तुम्ही सोशल मीडियावर Gandhi Jayanti Messages, Gandhi Jayanti Quotes, Gandhi Jayanti Images, Gandhi Jayanti Whatsapp Status पाठवून आपल्या मित्र-परिवारास गांधी जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Gandhi Jayanti 2023 Quotes (PC - File Image)

जग बदलायचं असेल आधी स्वत:ला बदला

- महात्मा गांधी

Gandhi Jayanti 2023 Quotes (PC - File Image)

असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात

आणि असे शिका की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात.

- महात्मा गांधी

Gandhi Jayanti 2023 Quotes (PC - File Image)

माझा धर्म सत्य आणि अंहिसेवर आधारीत आहे.

सत्य माझा परमेश्वर

आणि अंहिसा त्याला प्राप्त करण्याचे साधन

- महात्मा गांधी

Gandhi Jayanti 2023 Quotes (PC - File Image)

केवळ प्रसन्नताच एकमेव अत्तर आहे,

जे तुम्ही इतरांवर शिंपडल्यास

त्यातील काही थेंब नक्कीच तुमच्यावर पडतील.

- महात्मा गांधी

Gandhi Jayanti 2023 Quotes (PC - File Image)

ज्या दिवशी एक महिला

रात्री रस्त्यावर एकट्याने फिरू शकेल,

त्या दिवशी आपल्या भारताला

स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो.

- महात्मा गांधी

Gandhi Jayanti 2023 Quotes (PC - File Image)

व्यक्ती हा आपल्या विचारांनी घडणारा प्राणी आहे,

तो जो विचार करतो तसाच तो बनतो.

- महात्मा गांधी

महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. लोकांना सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक महत्त्वाच्या चळवळी केल्या. त्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले होते. गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने दिल्लीतील राजघाटावर जमतात.