Ganpati Visarjan Messages in Marathi: अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पच्या विसर्जनाला मराठी WhatsApp Stickers, Quotes, Images शेअर करून गणेशभक्तांना द्या शुभेच्छा

'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या' चा नाद करणारे मेसेजेस, Quotes सोशल मीडियामध्ये शेअर करून गणपतीला द्या यंदा निरोप!

Ganesh Visarjan Status | File Photo

Anant Chaturdashi 2020 Message in Marathi: महाराष्ट्रात गौरी-गणपतीचा (Gauri Ganpati) सण धूमधडाक्यामध्ये साजरा केल्यानंतर आता 10 दिवसांच्या बाप्पाच्या निरोपाचा क्षण देखील जवळ आला आहे. मागील 10-11 दिवस गणेशभक्तांसाठी अत्यंत खास होते. दिवस-रात्र बाप्पाची पूजा, आरती, सजावट यामध्ये गेल्यानंतर आता 1 सप्टेंबर  दिवशी घरगुती गणेशोत्सामधील गणपतींचे विसर्जन (Ganpati Visarjan) केले जाणार आहे. बाप्पाला निरोप देताना त्याचे आशिर्वाद तुमच्या मित्रपरिवारावर, प्रियजनांवर, नातेवाईकांवर कायम रहावेत यासाठी यंदाच्या गणेशोत्सवामधील गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस (WhatsApp Messages), स्टेटस (Status), फेसबूक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून मराठमोळ्या शुभेच्छा, मेसेजेस, ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images, Wallpapers च्या माध्यमातून देऊन घरगुती गणेशोत्सवाच्या शेवटचा दिवस देखील मंगलमय करा. त्यासाठी 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या' चा नाद करणारे मेसेजेस, Quotes सोशल मीडियामध्ये शेअर करण्यासाठी खालील दिलेल्या शुभेच्छापत्रांचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता.

 गणपती बाप्प्पा हे आबालवृद्धांचं आवडतं दैवत आहे. त्यामुळे त्याच्या विसर्जनाला अनेक गणेशभक्तांचे डोळे पाणावतात. मात्र जड अंतकरणाने आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये बुद्धीची देवता, संकटमोचक गणरायाला निरोप देऊनच या उत्सवाची सांगता केली जातो. त्यामुळे जगभरातील गणेशभक्तांना बाप्पा जाता-जाता कोरोना संकटातून मुक्त करून जाईल अशी प्रार्थना करून त्याच्या चरणी माथा ठेवा!

 

 गणपती विसर्जन मेसेजेस

Ganesh Visarjan 2020 Status | File Photo

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती

तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना

घेऊन जावो! हीच आमची कामना

बाप्पा मोरया !

Ganesh Visarjan Status | File Photo

गणपती बाप्पा मोरया,

पुढल्या वर्षी लवकर या!

Ganesh Visarjan 2020 | File Photo

गणपती विसर्जन 2020

Ganpati Bappa Morya | File Image

रिकामं झालं घर, रिता झाला मखर

पुढल्या वर्षी लवकर येण्यास

निघाला आमचा लंबोदर!

Gauri Ganpati Visarjan 2020| File Photo

गणपती चालले गावाला,

चैन मिळेना आम्हांला ।।

गणपती बाप्पा मोरया

Ganesh Visarjan 2020 | File Photo

गणपती बाप्पाला निरोप देताना घरामध्ये उत्तरपूजा केली जाते. बाप्पासोबत शिदोरी देऊन त्याची आरती करून विसर्जनासाठी बाहेर काढलं जातं. आगमनासारखीच विसर्जनादेखील मोठी धामधूम असते. तासनतास गणरायाचा जयघोष करत बाप्पाची मिरवणूक निघते. मात्र यंदा हा मिरवणूकीचा धुमधडाका नसेल. महाराष्ट्रासह जगभर कोरोनाचं सावट असल्याने सध्या साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे विसर्जनदेखील अत्यंत मोजक्या लोकांमध्येच नदी, पाणवठा, समुद्र, कृत्रिम तलावं किंवा अगदी घरच्या घरी केले जाईल.