Ganesh Chaturthi 2022 Messages In Marathi: गणेश चतुर्थी निमित्त खास मराठी Wishes, Images, Quotes, WhatsApp Status शेअर करून उत्साहात स्वागत करा बाप्पाचे!
तुम्ही या ईमेज डाऊनलोड करून तुमच्या मित्र-परिवारास शेअर करू शकता.
Ganesh Chaturthi 2022 Messages In Marathi: भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यावेळी 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यावेळी गणेश चतुर्थी बुधवारी आहे. बुधवार हा गणपतीचा दिवस मानला जातो, त्यामुळे यावेळच्या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. यावेळी गणेश चतुर्थी रवियोग आणि ब्रह्मयोगात साजरी होत आहे. यासोबतच सर्वार्थसिद्धी योगही तयार होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. या दिवशी मंदिर आणि घरांमध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि संपूर्ण 10 दिवस बाप्पाची विधिवत पूजा केली जाते.
गणेश चतुर्थी निमित्त Ganesh Chaturthi Wishes, Ganesh Chaturthi Status, Ganesh Chaturthi Shubhechha, Ganesh Chaturthi Quotes, Ganesh Chaturthi Images, Ganesh Chaturthi Banner, Ganesh Chaturthi Sms, Ganesh Chaturthi Messages, तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीत द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज उपयोगात येतील. तुम्ही या ईमेज डाऊनलोड करून तुमच्या मित्र-परिवारास शेअर करू शकता.
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…
सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा,
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना,
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य वाढले.
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही वरील मेसेज शेअर करून गणरायाचे स्वागत करु शकता. तुम्ही हे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास शेअर करू शकता.