Ganesh Chaturthi 2022: जाणून घ्या गणपती स्थापनेचा मुहूर्त, ‘या’ वेळात करा बाप्पाची प्रतिष्ठापना

पंचांगाप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आहे.

Ganpati Bappa Morya | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

आज गणेशचतुर्थी (Ganesh Chaturthi 2022) बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा दिवस. तसं तर आज संपूर्ण आणि पुढील दहा दिवसचं बाप्पाचे आहेत. त्यामुळे आज दिवसभरात कुठल्याही वेळात बाप्पाची  प्रतिष्ठापणा (Ganpati Sthapana) करता येईल. तरी आजच्या दिवसात काही विशेष मुहूर्त साधत गणेशाची प्रतिष्ठापणा केल्यास अधिक मंगलदायक ठरेल. पंचांगाप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत  आहे. तरी या कालावधी दरम्यान तुम्ही तुमच्या घरी कुठल्याही वेळात बाप्पाची स्थापना करु शकतात. स्थापना करताना आपण साधारणतः ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी करू शकता.

 

पहाटे पावणे पाच ते दुपारी दोन म्हणजे जवळपास नऊ तासात कुठल्याही वेळात बाप्पाची स्थापना करणं मंगलदायक ठरेल. तरी अगदीच विशेष मुहूर्ताप्रमाणे बघितल्यास सकाळी 6 वाजून 25 मिनिटे ते 9 वाजून 33 मिनिटापर्यंत किंवा सकाळी 11 वाजून 7 मिनिटे ते 12 वाजून 41 मिनिटांपर्यत गणपती स्थापना करणे अधिक लाभदायक ठरेल. श्रावणात जसे महादेवाच्या पूजनाला महत्व आहे तसेच, भाद्रपद मध्ये गणरायाच्या पूजनाला फार महत्व आहे. (हे ही वाचा:- Ganeshotsav 2022: लाडक्या बाप्पाचे गजराजाकडून विशेष स्वागत, पहा व्हिडीओ)

 

आजपासून पुढील दहा दिवसांसाठी लाडके  गणपती बाप्पा सर्वांच्या घरी, मंडळात विराजमान होतील. बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला कोणतीच कमतरता भासायला नको म्हणून बाप्पाच्या स्थापनेबाबत आम्ही तुमच्यासाठी विशेष माहिती घेवून आलो आहेत. तरी आजचा संपूर्ण दिवसचं बाप्पाचा आहे तरी आज दिवसभरात तुम्ही कुठल्याही वेळात तुम्ही गणेशाची स्थापना करु शकता.