Ganesh Chaturthi 2022 Date: गणेश चतुर्थीची तारीख, तिथी, पूजा पद्धत, मुहूर्त आणि पूजा साहित्य यादी, जाणून घ्या

चला तर मग जाणून घेऊया, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी आणि पूजा साहित्य यादी

GSB Seva Mandal Ganpati (Photo Credits-Facebook)

Ganesh Chaturthi 2022 Date :हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो  आणि तेव्हापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. गणेशोत्सवाचा हा उत्सव 10 दिवस चालतो. प्रत्येक घरात गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, 10 दिवस मनोभावे पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाची विधिवत पूजा करून आणि मूर्तीचे विसर्जन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग जाणून घेऊया, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी  [हे देखील वाचा: Ganpati Special Train: अरे वा! गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष अतिरिक्त रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय ]

गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त

गणेश चतुर्थी 2022 पूजा- पद्धत

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून घरातील मंदिरात दिवा लावावा. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. भाविकांनी आपल्या इच्छेनुसार गणपतीची मूर्ती स्थापन करावी. यानंतर मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करावा. आता गणपतीला फुले आणि दुर्वा अर्पण करावे. दुर्वा गणपतीला अतिशय प्रिय आहे. असे मानले जाते की, दुर्वा अर्पण केल्याने गणेश प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात. श्रीगणेशाच्या पूजेच्या वेळी मूर्तीला शेंदूर लावा आणि आवडते भोग मोदक किंवा लाडू अर्पण करा. पूजेच्या शेवटी, आरती करून श्रीगणेशाची पूजा करा आणि प्रार्थना करा. शेवटी प्रसादाचे वाटप करावे.

गणेश चतुर्थी पूजा सामग्री लिस्ट