Ganesh Chaturthi 2020 Messages: गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Images च्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव!

त्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, HD Images, Wallpapers आणि शुभेच्छापत्रं.

Ganesh Chaturthi 2020 Messages | File Photo

Ganesh Chaturthi Messages in Marathi : महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा खास थाट पाहायला मिळतो. विशेषतः कोकणात गणेशोत्सवाचा विशेष उत्साह असतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणरायाचे आगमन होते. त्यामुळे या चतुर्थीला 'गणेश चतुर्थी' असे म्हणतात. यंदा शनिवार, 22 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत आहे. गणपतीच्या आगमानाची जय्यत तयारी घरोघरी पाहायला मिळते. गणपतीचे मखर, आरास तयार केले जातात. मुंबईतील गणेश मंडळं अत्यंत लोकप्रिय आहेत. मोठेमोठे देखावे आणि भव्य गणेश मुर्ती पाहण्यासाठी दूरवरुन लोकं मुंबईत दाखल होतात. मुंबईत काम करणारे कोकणवासिय गणेशोत्सवासाठी अगदी आवर्जुन गावी जातात. मात्र यंदा कोविड-19 च्या संकटामुळे दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवाचा जल्लोष साजरा करता येणार नाही. (गणपती बसवण्यासाठी घरच्या घरी सुरेख मखर कसे बनवाल?, Watch Video)

अनेक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केल्याने मंडळांमध्ये जावून गणपती दर्शन करता येणार नाही. तसंच नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे गणपती दर्शनासाठी जाता येणार नाही. परंतु, सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरुन शुभेच्छा संदेश शेअर करुन तुम्ही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, HD Images, Wallpapers आणि शुभेच्छापत्रं.

गणेश चतुर्थी शुभेच्छा!

सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.

"गणपती बाप्पा मोरया,

मंगलमुर्ती मोरया !!!"

Ganesh Chaturthi 2020 Messages | File Photo

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरद विनायकाला..

प्रार्थना करतो गजाननाला,

सुखी ठेव नेहमी..

गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2020 Messages | File Photo

देव येतोय माझा…

आस लागली तुझ्या दर्शनाची,

तुला डोळे भरून पाहण्याची,

उजाडली ती सोनेरी पहाट,

गणराया तुझ्या आगमनाची…

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2020 Messages | File Photo

कुणी म्हणे तुज “गणपती”

विद्येचा तू अधिपती..

कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”

शक्तिमान तुझे सोँड..

गणपती बाप्पा मोरया

गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2020 Messages | File Photo

सजली अवघी धरती,

पाहण्यास तुमची कीर्ती..

तुम्ही येणार म्हटल्यावर,

नसानसात भरली स्फुर्ती..

आतुरता फक्त आगमनाची,

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…

गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2020 Messages | File Photo

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर स्किटर्स डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.

गणपती हा सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा अधिपती आहे. विघ्नहर्ता असल्याने कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम श्रीगजाननाची पूजा करतात. गणपतीचे आगमन झाल्यानंंतर प्रत्येक घराच्या प्रथेनुसार, दीड, पाच, सात, दहा दिवस गणपती घरी विराजमान असतात. हे दिवस अत्यंत आनंदाचे, उत्साहाचे आणि भक्तिमय असतात.