Best Diwali Gifts:1000 रुपयाच्या आतील 10 सर्वोत्तम भेटवस्तू जे तुमच्या प्रिय व्यक्तीच्या चेहऱ्यावर घेऊन येतील गोड हसू , पाहा यादी

1000 रुपयापर्यंत कोणत्या भेटवस्तू घेता येतील त्याची यादी आम्ही घेऊन आलो आहोत, यादीपासून तुम्ही ठरवू शकता, यावेळी दिवाळी निमित्त काय हटके भेटवस्तू द्यावी, चला तर मग पाहूया

दिवाळी गिफ्ट Photo Credits: pexels.com

Best Diwali Gifts : दिवाळी जवळ आली आहे, दिवाळीची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. घर सजावट, फराळ, लक्ष्मीपूजन इत्यादीसाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दरम्यान, अनेकांना चिंता असते ती भेटवस्तूची, मित्र, नातेवाईक किंवा कर्मचाऱ्यांना सणानिमित्त भेटवस्तू दिल्या जातात. भेटवस्तू देतांना कमी पैशांमध्ये सुंदर भेटवस्तू घ्यावी यासाठी अनेक ठिकाणी हटके भेटवस्तू सर्च केल्या जातात. दरम्यान, काळजी करू नका, 1000 रुपयापर्यंत कोणत्या भेटवस्तू घेता येतील त्याची यादी आम्ही घेऊन आलो आहोत, खाली दिलेली यादीपासून तुम्ही ठरवू शकता, यावेळी दिवाळी निमित्त काय हटके भेटवस्तू द्यावी, चला तर मग पाहूया    

पाहा यादी 

1- रिचार्जेबल मून लॅम्प

दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. दिवाळीच्या दिवशी घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशित केला जातो.  या दिवाळीला  हा रंगीबेरंगी रिचार्जेबल मून लॅम्प भेट देऊ शकता. तुम्ही Amazon वरून 999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.

2- बॉक्ससह फुलांचा बाऊल सेट

'धनतेरस' आणि 'दिवाळी' निमित्त तुम्ही भेट म्हणून बॉक्ससह पितळाचा बाऊल सेट देऊ शकता. तुम्ही हा सेट Amazon वरून 385 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.

3- मोझॅक ग्लास व्होटिव्ह टीलाइट Candle Holder

तुम्ही  6 Mosaic Glass Votive Tealight Candle Holders चा पॅक घेऊ शकता. तुम्ही Amazon वरून 799 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता. ही भेटवस्तू सर्वांना आवडेल अशी आहे . 

4 -  स्ट्रिंग लाइट्स

दिवाळीच्या निमित्ताने खोलीला वेगळा टच द्यायचा असेल, तर 12 स्टार्स एलईडी कर्टन स्ट्रिंग लाइट्स ही एक उत्तम भेट आहे. यामध्ये तुम्हाला 8 फ्लॅशिंग मोड देखील मिळतील. तुम्ही Amazon वरून Rs.395 मध्ये ऑर्डर करू शकता.

5- गिफ्ट कॉम्बो

तुम्ही याला  बेस्ट दिवाळी गिफ्ट सेट देखील म्हणू शकता. कारण या कॉम्बोमध्ये तुम्हाला अनेक गिफ्ट पॅक मिळणार आहेत. यामध्ये 1 लाल किताब , 1 तोरण, 4 विविधरंगी दिव्यांचा सेट, 1 ज्यूट बॅग, 6 थँक यू आणि गिफ्ट कार्ड्स, 1 किड्स नोटपॅड, 2 गणेश प्लांटेबल पेन्सिल आणि बरेच काही  यांचा समावेश आहे. तुम्ही Amazon वरून 999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.