Bijaya Dashmi Wishes in Bengali: विजयादशमीनिमित्त Quotes, Messages, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारा खास बंगाली भाषेत शुभेच्छा देऊन साजरा करा दसऱ्याचा सण!

तुम्ही देखील Quotes, Messages, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारा आपल्या मित्र-परिवारास खास बंगाली भाषेत शुभेच्छा देऊन दसऱ्याचा सण साजरा करू शकता.

Bijaya Dashmi Wishes in Bengali 6 (फोटो सौजन्य - File Image)

Bijaya Dashmi Wishes in Bengali: दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री (Navratri 2024) साजरी केली जाते. दुसऱ्या दिवशी दसरा साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा (Vijayadashami 2024) हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या शुभ मुहूर्तावर सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या मैदानात रावण दहनाचे आयोजन केले जाते.

विजयादशमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. या शुभमुहूर्तावर अयोध्येत विजयादशमी साजरी करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केली जाते. यंदा अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी साजरी होत आहे. विजयादशमीनिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Quotes, Messages, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारा आपल्या मित्र-परिवारास खास बंगाली भाषेत शुभेच्छा देऊन दसऱ्याचा सण साजरा करू शकता.

Bijaya Dashmi Wishes in Bengali 1 (फोटो सौजन्य - File Image)
Bijaya Dashmi Wishes in Bengali 2 (फोटो सौजन्य - File Image)
Bijaya Dashmi Wishes in Bengali 3 (फोटो सौजन्य - File Image)
Bijaya Dashmi Wishes in Bengali 4 (फोटो सौजन्य - File Image)
Bijaya Dashmi Wishes in Bengali 5 (फोटो सौजन्य - File Image)

पश्चिम बंगालमध्ये अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दुर्गापूजेची सांगता होईल. या शुभ तिथीला माँ दुर्गा मूर्तीचे विसर्जन होणार आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबरला आहे. दशमी तिथी या दिवशी सकाळी 10.59 वाजता सुरू होईल आणि 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 09.08 वाजता समाप्त होईल. कॅलेंडरनुसार, 12 ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे.