Happy Dhanteras 2023 Messages: धनत्रयोदशीच्या शुभेच्छा Messages, Images, Greetings द्वारा शेअर करत साजरा करा धनतेरस

या दिवशी लोक निरोगी, आरोग्यदायी जीवनासाठी भगवान धन्वंतरीला प्रार्थना करतात तसेच एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Messages, Images, Greetings द्वारा आपल्या मित्र परिवारास धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Dhanteras 2023 Messages (PC - File Image)

Happy Dhanteras 2023 Messages: दरवर्षी दिवाळीच्या (Diwali 2023) दोन दिवस आधी धनत्रयोदशी (Dhantrayodashi) साजरी केली जाते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी, सोने, दागिने अशा अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा भगवान धन्वंतरी अमृत पात्रासह प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. यासाठी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी अमृताचे भांडे घेऊन जाताना दिसत असल्यामुळे लोक या दिवशी भांडी खरेदी करतात आणि घरी पूजा करतात.

या दिवशी तांब्याचे भांडे खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. जे भांडी संपत्ती वाढवण्यासाठी खूप शुभ मानले जाते. या दिवशी लोक निरोगी, आरोग्यदायी जीवनासाठी भगवान धन्वंतरीला प्रार्थना करतात तसेच एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Messages, Images, Greetings द्वारा आपल्या मित्र परिवारास धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - Gold Buying Tips On Dhanteras: धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी)

धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो

व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो

ही ईश्वर चरणी प्रार्थना,

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras 2023 Messages (PC - File Image)

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Dhanteras 2023 Messages (PC - File Image)

धनत्रयोदशीचा हा दिन

धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन

लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी

तुमची मनोकामना होवो पूरी

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras 2023 Messages (PC - File Image)

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा

घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras 2023 Messages (PC - File Image)

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो

ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची

आणि भरभराटीची जावो

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras 2023 Messages (PC - File Image)

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी

कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी

फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी

मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी

धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Dhanteras 2023 Messages (PC - File Image)

धनत्रयोदशीची त्रयोदशी तिथी 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12:35 वाजता सुरू होईल आणि 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1:57 वाजता संपेल. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 5:05 नंतर खरेदीचा शुभ मुहूर्त आहे. त्यापूर्वी विष्कुंभ योग आहे ज्यामध्ये खरेदी करणे शुभ मानले जात नाही. मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेले सोने, चांदी आणि इतर वस्तूंचे मूल्य अनेक पटींनी वाढते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now