Buddha Purnima 2019 Quotes: गौतम बुद्ध यांचे हे '5' प्रेरणादायी विचार बदलतील तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!

गौतम बुद्धांच्या विचारांची पुन्हा एकदा नव्याने ओळख करुन देतील असे हे सुंदर विचार

Buddha Jayanti 2019 (Photo Credit: File Photo)

Buddha Purnima 2019 Quotes & Messages: स्वत:चे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्ग स्विकारणा-या गौतम बुद्धांना (Gautama Buddha) वैशाख शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच विशेष ज्ञान प्राप्त झाले ज्यात त्यांना दु:ख नाहीसे करण्याचा मार्ग सापडला, म्हणूनच बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा ही बुद्ध पौर्णिमा 18 मे ला साजरी करण्यात येणार आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी म्हणजेच गौतम बुद्धांनी 7 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका बोधिववृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले अशी ह्या मागची कथा आहे. ही ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी जगाला दिलेले विचार हे आजही अजरामर आहेत. मात्र ह्या कलियुगात हे विचार आचरणात आलेले लोक अगदी बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यामुळे त्यांच्या त्या विचारांची पुन्हा एकदा आठवण आणि ओळख करुन देणारे विचार आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गौतम बुद्धांचे काही 5 सुंदर विचार:

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात

Buddha Jayanti 2019 (Photo Credit: File Photo)

तीन वस्तू जास्त वेळ लपू शकत नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य...

Buddha Jayanti 2019 (Photo Credit: File Photo)

चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो, त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते

Buddha Jayanti 2019 (Photo Credit: File Photo)

आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करु शकतो.

Buddha Jayanti 2019 (Photo Credit: File Photo)

ख-या अर्थाने स्वत:वर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही

Buddha Jayanti 2019 (Photo Credit: File Photo)

बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे. यंदाही येत्या शनिवारी 18 मे ला आलेली बुद्धपौर्णिमा केवळ साजरी न करता कलियुगात ह्या विचारांचे आचारण नक्की  व्हावे हीच अपेक्षा.