Ashadhi Ekadashi 2023 Wishes In Marathi: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा आजचा दिवस
आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीच्या भक्तांचा आजचा दिवस मंगलमय वातावरणात सुरू करण्यासाठी तुम्ही Greetings, Photos, Images शेअर करत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.
आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) हा वारकरी बांधवांसाठी वर्षभरातील सर्वात खास दिवस आहे. मजल-दरमजल करत पंढरपूरात (Pandharpur) दाखल झालेले वारकरी (29 जून) दिवशी विठ्ठल-रूक्मिणीचं (Vitthal-Rukmini) दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा दिवस साजरा करणार आहेत. मग या मंगलमय दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विठू माऊलीच्या भक्तांना सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Images, Quotes शेअर करू शकता. देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) म्हणून देखील आषाढी एकादशी ओळखली जाते. ज्या भक्तांना आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेता येत नाही ते नजिकच्या मंदिरात विठू माऊलीचं दर्शन घेतात. या निमित्त अनेक ठिकाणी दिंडी, पालख्यांचं आयोजन केले जाते. मग अशा या भक्तिमय वातावरणामध्ये तुम्ही आषाढीच्या शुभेच्छा नक्कीच प्रियजन, आप्तेष्टांसोबत शेअर करू शकता.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडते त्यानंतर भाविकांना दर्शन खुले केले जाते. मात्र यंदा या परंपरेला थोडा छेद देत शासकीय पूजे दरम्यानही विठ्ठल-रूक्मिणीचं मुखदर्शन भाविकांसाठी खुलं केलं जाणार आहे. नक्की वाचा: Ashadhi Ekadashi 2023 Rangoli Designs: आषाढी एकादशीनिमित्त काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ .
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
विठु माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची...
विठू माऊलीच्या भक्तांना
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे !
आषाढी एकादशीच्या विठूभक्तांना मनापासून शुभेच्छा
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीचं औचित्य साधत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरात दाखल होते त्यांच्यासोबत वैष्णवांचा मेळा देखील पोहचतो. पंढरपूरासह राज्यभरातील विठूमाऊलीची मंदिरं भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. या निमित्ताने अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही विठू नामाचा गजर केला जातो. काही भाविक या निमित्त एक दिवस व्रत पाळतात.