Ashadhi Ekadashi 2020 Messages: आषाढी एकादशी निमित्त मराठमोळे शुभेच्छापत्रं, Images, Wishes, Facebook व WhatsApp वर शेअर करुन साजरा करा हा मंगलमय सण!

मात्र यंदा कोविड-19 दहशतीमुळे हे काही अनुभवता येणार नाही.असे जरी असेल तरी नाराज होण्याचे कारण नाही. सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही आषाढी एकादशीचा उत्साव कायम राखू शकता.

Ashadhi Ekadashi 2020 | File Image

Ashadi Ekadashi Messages in Marathi: आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते पंढरपूरची वारी. वर्षभरात येणाऱ्या 24 एकदाशांमध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व विशेष आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला 'आषाढी एकादशी' असे म्हणतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो. त्या दिवशी देव झोपतात म्हणून या एकादशीला 'देवशयनी एकादशी' असेही म्हणतात. यंदा 1 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत पंढरपूरला जातात. यालाच 'आषाढी वारी' म्हणतात. यात सामील होतात ते 'वारकरी.' हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, साथीला मृदंग अशा वेषात वारकरी वारीत सामील होतात. विठोबा-रखुमाई, ग्यानबा-तुकाराम, जयजय राम कृष्ण हरी असे गात नाचत वारी आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होते. विठ्ठलाच्या महापूजेनंतर मोठ्या संख्येने आलेले भाविक विठुरायाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशी निमित्त व्रत करण्याची पंरपरा आहे. या व्रताचा आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ करतात. (हेही वाचा Ashadhi Ekadashi 2020 Wishes: आषाढी एकादशी निमित्त Images, WhatsApp Status, Messages द्वारे द्या शुभेच्छा!)

मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर या भव्यदिव्य सोहळ्याचे अत्यंत साधे रुप पाहायला मिळाले. तसंच राज्यातील विविध विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. शाळांमध्ये दिंडी काढली जाते. मात्र यंदा कोविड-19 दहशतीमुळे हे काही अनुभवता येणार नाही.असे जरी असेल तरी नाराज होण्याचे कारण नाही. सोशल मीडियाच्या WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन शुभेच्छा संदेश, Messages, Wishes पाठवून तुम्ही आषाढी एकादशीचा उत्साह कायम राखू शकता. यासाठी काही खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रिटींग्स, शुभेच्छापत्रं...

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

हेची दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi Marathi Messages | File Image

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख

पाहीन श्रीमुख आवडीने|

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi Marathi Messages | File Image

जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा

आनंदे केशवा भेटतांचि

या सुखा उपमा नाही त्रिभुवनी

पहिली शोधोनी अवघी तीर्थे

आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi Marathi Messages | File Image

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई

सुखालाही आला या हो आनंदाचा पूर

चालला नामाचा गजर| अवघे गरजे पंढरपूर||

आषाढी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi Marathi Messages | File Image

विठ्ठल विठ्ठल

नाम तुझे ओठी

पाऊले चालती

वाट हरीची...

नाद पंढरीचा

साऱ्या जगा मधी...

चला जाऊ पंढरी

आज आषाढी एकादशी...

आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi 2020 | File Image

तुकाराम, नामदेव, जनाबाई आदी संतांनी विठ्ठलभक्तीचे महत्त्व लोकांना सांगितले. आपली दैनंदिन कामे करत असताना मुखाने पांडुरंगाचे नाव घ्यावे, असा हा साधा सोपा भक्तीमार्ग लोकांना भावला. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये विठ्ठलभक्तीची परंपरा चालू झाली. ती अद्याप अखंड आहे.