Happy Akshaya Tritiya 2020 Images: अक्षय्य तृतीया सणाच्या शुभेच्छा मराठी Wishes, Messages, HD Wallpapers,च्या माध्यमातून देत साजरा करा साडेतीन मुहूर्तांमधील हा खास दिवस!
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देण्यासाठी या खास मराठी Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकाल.
Akshaya Tritiya 2020 Hd Images: आज, रविवार 26 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2020) हा सण साजरा होणार आहे. हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या सणाचे हिंदू धर्मीयांमध्ये मोठे महत्व आहे. या सणाच्या नावाप्रमाणे अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारे कायम टिकून राहणारे सुख, शांती, समृद्धी मिळवण्यासाठी आजच्या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूचे पूजन केले जाते. याच दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम (Parshuram Jayanti) , बसवेश्वर जयंती (Basveshwar Jayanti) आणि, हयग्रीव जयंती असल्याने अनेक योग एकाच दिवशी जुळून आले आहेत. इतक्या महत्वाच्या सणानिमित्त आपले आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार सर्वांना शुभेच्छा द्यायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छापत्र तयार केली आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात या सणाच्या नावाप्रमाणे अक्षय्य शुभेच्छा तुमच्या जवळच्या मंडळींंसोबत खास मराठी Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकाल. Akshaya Tritiya 2020: अक्षय्य तृतीया सण महाराष्ट्रासहित भारतातील विविध भागात कसा साजरा केला जातो? जाणून घ्या
अक्षय्य तृतीया या सणाच्या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. यंदा ही खरेदी ऑनलाईन पद्धतीने शक्य असेल तरच आणि काळजीपूर्वक करा अन्यथा घरच्या घरी पूजा अर्चना आणि जवळच्या मंडळींना शुभेच्छा देऊन तुम्ही हा सण साजरा करू शकता. Akshaya Tritiya 2020: अक्षय्य तृतीया दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
अक्षय्य तृतीया शुभेच्छापत्र
दरवर्षी हिंदू धर्मियांकडून हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा विविध प्रांतात हा सण साजरा करण्याच्या विविध पद्धती आहेत.महाराष्ट्रातील लोक या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. तर उत्तर भारतातील लोक या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असे मानतात. तुम्हा सर्वांना या अक्षय्य तृतीय सणाच्या लेटेस्टली परिवाराकडूनही खूप खूप शुभेच्छा!