Akshay Tritiya Wishes in Marathi: अक्षय्य तृतीयेला मराठी Messages, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन मंगलमयी वातावरणात साजरा करा हा सण

या दिवसाची आठवण कायम राहावी आणि हा दिवस चांगला जावा यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश....

Akshay Tritiya Wishes in Marathi: (Photo Credits: File)

Akshaya Tritiya Wishes in Marathi: साडेतीन मुहूर्तापैकी एक असा ओळखला जाणारा अक्षय तृतीयचा मुहूर्त.... यंदा 14 मे ला हा सण आला आहे. या सणाच्या निमित्ताने लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याची खरेदी केली जाते. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फल मिळते. विष्णू पार्वतीचे स्वामित्व असलेली ही तिथी आहे. या दिवशी केलेल्या देवपूजेमुळे घराण्यातील अनेक दोष नष्ट होतात. यंदा कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने आपल्याला सोन्याची किंवा अन्य वस्तूंची ऑनलाईन शॉपिंगच करावी लागेल. दरम्यान घराबाहेर न पडता एकमेकांना अक्षय्य तृतीयाच्या (Akshay Trititya 2021) शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सोशल मिडियाचा वापर करु शकता.

मेसेजेस, व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक, ग्रिटिंग्सद्वारे तुम्ही एकमेकांना अक्षय्य तृतीयाचे शुभेच्छा संदेश पाठवू शकता. या दिवसाची आठवण कायम राहावी आणि हा दिवस चांगला जावा यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश....

अक्षय्य तृतीयाच्या शुभ दिनी

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा

सुख, समृद्धी येवो तुमच्या जीवनी

हिच मनापासून सदिच्छा

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

Akshay Tritiya Wishes in Marathi: (Photo Credits: File)

धन लक्ष्मी येवो घरी,

लक्ष्मीची कृपादृष्टी असो त्यावरी

करुन सोन्याची खरेदी

करु अक्षय्य तृतीया साजरी

अक्षय्य तृतीया च्या शुभेच्छा!

Akshay Tritiya Wishes in Marathi: (Photo Credits: File)

सोन्याच्या झळाळीप्रमाणे

उजळून जावो आयुष्य तुमचे

सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी

हेच मागणे ईश्वराकडे आमचे

अक्षय्य तृतीया च्या शुभेच्छा!

Akshay Tritiya Wishes in Marathi: (Photo Credits: File)

अक्षय्य तृतीयाच्या तुम्हांस व तुमच्या संपूर्ण परिवारास हार्दिक शुभेच्छा!

Akshay Tritiya Wishes in Marathi: (Photo Credits: File)

अक्षय्य सुखाचा दिलासा

मनात कर्तृत्वाचा भरवसा

लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा

शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा

अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

Akshay Tritiya Wishes in Marathi: (Photo Credits: File)

या दिवशी केलेल्या जप, होम, दान इत्यादी गोष्टी अक्षय फल देणाऱ्या होतात. म्हणूनच या दिवशी चांगले विचार करावेत, चांगले काम करावे, चांगले बोलावे म्हणजे तेही अक्षय होऊन जाते. अशा या मंगलमयी दिनाच्या लेटेस्टली मराठी कडून हार्दिक शुभेच्छा!