नवं वधूने चुकूनही 'या' ब्युटी टिप्स वापरु नका!
चुकीच्या पद्धतीच्या ब्युटी टिप्स उपयोगात आणल्यात तर ते चेहऱ्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे जर तुम्हाला चेहऱ्याची स्किन नितळ आणि चमकदार ठेवायची असेल तर 'या' गोष्टींपासून नव वधूंनी दूर राहणे आवश्यक आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे नवं वरवधू यांची लग्नासाठी तयारी जोरात सुरु असणार. परंतु सुंदर दिसण्यासाठी नवं वधू विविध पद्धतीचे ब्युटी प्रोडक्टस वापरतात. त्यामुळे चेहऱ्याची स्किन ही नितळ आणि सुंदर दिसते. मात्र चुकीच्या पद्धतीच्या ब्युटी टिप्स उपयोगात आणल्यात तर ते चेहऱ्यासाठी घातक ठरु शकते. त्यामुळे जर तुम्हाला चेहऱ्याची स्किन नितळ आणि चमकदार ठेवायची असेल तर 'या' गोष्टींपासून नवं वधूंनी दूर राहणे आवश्यक आहे.
ऐन लग्नसाराईवेळी जर नव वधू चेहऱ्याच्या नितळ स्किनसाठी इन्वेसिव ट्रिटमेंट घेत असेल तर ती त्वरीत बंद करावी. तसेच केमिकल औषधे आणि लेजर तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहऱ्यावरील स्किनचा नॅचलरपणा निघून जातो. त्यामुळे चेहऱ्याची स्किन वृक्ष होण्याची शक्यता असते. काही नव वधू लग्न होण्यापूर्वी इन्वेसिव ट्रिटमेंटचा उपयोग करतात त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जातो.
जर चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स आल्या असतील तर तरुणी वारंवार त्याकडे लक्ष देतात. तसेच चेहऱ्यावरील या पिंपल्सला सारखे हात लावल्याने चेहऱ्याच्या स्किनला त्रास होतो. तर काही तरुणी पिंपल्स फोडतात. मात्र असे करु नका. असे केल्याने चेहऱ्यावर काळे डाग जाण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो. या स्थितीत तरुणींनी स्किन डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास उत्तम.
तुमच्या चेहऱ्याची स्किन चांगली ठेवण्यासाठी उत्तम ब्रँन्डचे फेशियल करण्यास हरकत नाही. तसेच सर्वात महत्वाचा सल्ला म्हणजे पुरेशी झोप आणि खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवावे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2019 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

