Shivaji Maharaj Jayanti 2019: छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण तुम्ही पुढील पिढीला द्याल?
साहस, धैर्य, निष्ठा, सर्वसमावेष वृत्ती या गुणांमुळे जनमानसांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
Shiv Jayanti 2019: साहस, धैर्य, निष्ठा, सर्वसमावेष वृत्ती या गुणांमुळे जनमानसांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचे दैवतच. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते. 'जनतेचा राजा' म्हणूनही त्यांचा उद्धार केला जातो. 19 फेब्रुवारी 1630 साली महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांचे काही गुण आपण अंगिकारण्याचा प्रयत्न करुया. तसंच ते पुढच्या पीढीपर्यंतही पोहचवूया. तर जाणून घेऊया बहुगुणी महाराजांचे असे कोणते गुण तुम्ही पुढच्या पीढीला द्याल?
धर्मनिरपेक्षता
स्वतःच्या धर्माप्रती, धर्मातील परंपरांविषयी शिवाजी महराजांच्या मनात प्रचंड निष्ठा, आदर होता. तरीही देखील त्यांनी कधीही इतर धर्मांचा तिरस्कार किंवा अनादर केला नाही. त्यांच्या सैन्यात हिंदूंप्रमाणे मुस्लिम मावळेही होते. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होते. आजच्या काळात लहानपणापासूनच मुलांमध्ये हा गुण रुजवणे, महत्त्वाचे झाले आहे.
साहसी वृत्ती
शिवाजी महाराजांच्या साहसकथा न ऐकणारी व्यक्ती दुर्मिळच असेल. केवळ शक्ती नव्हे तर युक्तीच्या जोरावर यशस्वीरित्या साहस कसे करावे, हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे.
निष्ठा
देश, स्वराज्य आणि काम यांच्या प्रती महाराज अत्यंत निष्ठावान होते. हीच निष्ठा आपण आपल्या दैनंदिन कामात आणली तर यशाकडे होणारी आपली वाटचाल कोणीच रोखू शकणार नाही.
स्त्रियांचा आदर
आजकालच्या काळात स्त्रियांचा आदर करणे हा महत्त्वपूर्ण गुण ठरत आहे. सध्या स्त्रियांवरील वाढते अत्याचार, शोषण हे पाहता आता स्त्री स्वातंत्र्यासोबत स्त्रीयांचा आदर करणेही तितकेचे महत्त्वाचे झाले आहे. महाराजांकडून ही शिकवण आपण नक्कीच पुढील पीढीला देऊ शकतो.
लीडरशीप
लीडरशीप हा शिवाजी महाराजांचा अतिशय महत्त्वाचा गुण. हातात अधिकार असताना सर्वसमावेष विचार करणे, इतरांना सोबत घेऊन पुढे जाणे, कुठेही बॉसी न होणे हा गुण प्रत्येकाने अंगिकारायला हवा.
टीमवर्क
कोणतेही काम एकट्याने होत नसते. तर त्यासाठी झटत असलेल्या संपूर्ण टीमची ती मेहनत असते. आजकालच्या काळात टीमवर्कचे महत्त्व नव्या पीढीला पटवून देणे गरजचे आहे. टीमवर्कमुळेच अनेक कामे सोपी होतात, लवकर होतात. आचार-विचारांची देवाण घेवाण होते. त्यामुळे 'मी'च बरोबर असे न मानता नवे विचार खुल्या मनाने स्वीकारण्याची वृत्ती बळावते.