Infanticide in Delhi: मुलाच्या हव्यासापोटी राजधानी दिल्लीत स्त्री भ्रूणहत्येची घटना; 22 वर्षीय आरोपी महिला अटकेत
मुलीऐवजी मुलगा हवा होता, म्हणून दिल्लीत 22 वर्षीय महिलेने आपल्या नवजात मुलीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
Infanticide in Delhi: स्त्री भ्रूणहत्येचा (Infanticide)धक्कादायक प्रकार दिल्लीतून समोर आला आहे. एका 22 वर्षीय महिलेने तिच्या 9 दिवसांच्या नवजात मुलीची हत्या केली. या प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. मुलीऐवजी मुलगा हवा होता म्हणून या महिलेने तिच्या तान्ह्या बाळाची हत्या केली. द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पतीने मुंडका पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर ही घटना उघडकीस आली. मृत नवजात बाळाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले की पत्नीने त्यांच्या नवजात मुलीचा गळा कापला. डीसीपी (बाह्य) जिमी चिराम यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी या घटनेत तत्काळ लक्ष घातले आणि 60, शिवमंदिर स्ट्रीट, बाबा हरिदास कॉलनी, टिकरी हे घटनास्थळ गाठले. पोलिसांनी तपास केला. (हेही वाचा:Madhya Pradesh Shocker: पोर्न पाहिल्यानंतर 13 वर्षीय भावाचा 9 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार; वडिलांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर आईसमोरच केली हत्या )
घटनास्थळी पोलिसांना मृत नवजात मुलगी दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत आढळली तर आरोपी महिला वेगळ्या खोलीत होती. घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. या महिलेला अटक करण्यात आली असून चौकशीत तिने मुलगी नको म्हणून आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. मृत बाळ हे त्या दाम्पत्याचे दुसरे अपत्य होते.(हेही वाचा:Kerala Shocker: मुलाच्या दारूच्या व्यसनामुळे हैराण जोडप्याची केरळमध्ये आत्महत्या )
खून झालेल्या मुलीचे वडील, बहादूरगडमधील चपलांच्या कारखान्यात मजूर म्हणून काम करतात. ते 2019 मध्ये रोजगाराच्या शोधात ते भावासह आणि आईसह दिल्लीला आले होते. गुन्हा घडलेल्या ठिकाणी कुटुंब एकत्र राहत होते. या जोडप्याला २ वर्षांचा मुलगाही आहे. कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2024 06:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

