Weather Update: देशात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता, महाराष्ट्रात पुढील 48 असं राहिल वातावरण
देशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Weather Update: आज महाराष्ट्रासह देशात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दिल्ली सह उतत्र प्रदेशातील काही राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ऑक्टोबर हिट मुळे नागरिकांना उष्णतेचा सामाना करावा लागत आहे. काही ठिकाणी पावसाने माघारी घेतली आहे. आज पावसाचे मुळे नागरिकांना उष्णतेचा दिलासा मिळणार आहे.
देशातील गुजरात, राजस्थानसह उत्तर प्रदेशातून मान्सूनने माघार घेतली आहे. उत्तर प्रदेशात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशासह, उत्तराखंडमध्येही पहाटे गुलाबी थंडी पडताना दिसत आहे. आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंढी आणि शिमला भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
14 Oct, उद्या कोकणातील काही ठिकाणी ढगाळ आकाश व काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता.
उत्तर मध्य महाराष्ट्र् काही ठिकाणी 🌧🌧
16 Oct also pic.twitter.com/a0NnGzjGd2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 14, 2023
महाराष्ट्रात ४८ तास काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहेय