India's Unemployment Rate: भारतात बेरोजगारीचा दर वाढला; शहरी भागात 6.7 टक्के लोक बेरोजगार; सर्वेक्षणातून माहिती समोर

नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) ने हे सर्वेक्षण केले. ज्यात भारतातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांचा समावेश होता.

Photo Credit- Pixabay

India's Unemployment Rate: कोणत्याही देशात तरूणांच्या हाताला काम नसणे किंवा देशात कामाच्या संधी नसणे ही अत्यंत वाईट परिस्थीती. भारतातही बेरोजगारी (Unemployment) मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एक सर्वेक्षण(Survey)तून बेरोजगारीबाबत दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. भारतातील शहरी भागात बेरोजगारीचा दर 6.7 टक्क्यांवर आला आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) ने हे सर्वेक्षण केले. ज्यात भारतातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांचा समावेश होता. २०२३ आणि २०२४ या वर्षांतील ही आकडेवारी आहे. ज्यात बेरोजगारीच्या आकडेवारीत चढ-उतार झाल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा:Unemployment in India: भारतातील रोजगाराची स्थिती अत्यंत गंभीर; देशातील बेरोजगारांमध्ये 83 टक्के तरुणांचा समावेश- Reports )

या सर्वेक्षणात महिला आणि पुरुषांमधील बेरोजगारीची आकडेवारीही जाहीर करण्यात आली आहे. ज्यात महिलांमध्ये बेरोजगारीचा दर हा ८.५ टक्के आहे. तर पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर 6.1 टक्के आहे. 2023च्या आकडेवारीनुसार जानेवारी-मार्च तिमाहीत बेरोजगारीचा दर 6.8 टक्के होता. तर, एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबरमध्ये तो 6.6 टक्के होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये तो 6.5 टक्के होता. 2024च्या जानेवारी-मार्च महिन्याची आकडेवारी समोर आली आहे. ज्यात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी बेरोजगारीचा दर शहरी भागात 6.7 टक्के होता

शहरी भागातील १५ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील महिलांमधील बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च २०२४ मध्ये घसरून ८.५ टक्के झाला आहे. जो गेल्यावर्षी याच तिमाहीत ९.२ टक्के होता. एप्रिल-जून 2023 मध्ये बेरोजगारीचा दर 9.1 टक्के, जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये 8.6 टक्के आणि ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये 8.6 टक्के होता.

पुरुषांमध्ये, शहरी भागातील बेरोजगारीचा दर जानेवारी-मार्च 2024 मध्ये वाढून 6.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. जो मागील वर्षी 6 टक्के होता. एप्रिल-जून 2023 मध्ये तो 5.9 टक्के, जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये 6 टक्के आणि ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये 5.8 टक्के बेरोजगारीचा दर होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif