Rescue Of 80 People In Goa: पाली धबधब्यात पर्यटक अडकले, 80 जणांची सुखरुप सुटका, पाहा व्हिडिओ
गोव्यातील पाली येथे निर्सगाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गेले होते. मुसळधार पावसाने ८० पर्यटक या परिसरात अडकल्याची माहिती समोर आली.
Rescue Of 80 People In Goa: राज्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गोव्यातील पाली येथे निर्सगाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गेले होते. मुसळधार पावसाने ८० पर्यटक या परिसरात अडकल्याची माहिती समोर आली. पर्यंटकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने बचाव कार्य सुरु केले. अथक प्रयत्नानंतर सर्व पर्यटकांना वाचवण्यात प्रशासनाच्या पथकाला यश आले आहे. (हेही वाचा- मुंबई लोकल ची हार्बर लाईन वरील रेल्वेसेवा ठप्प; Chunnabhati स्थानकात पाणीच पाणी, CSMT-Thane जलद मार्गावरील सेवाही स्थगित
मिळालेल्या माहितीनुसार, पाली धबधब्याजवळ पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच गोवा अग्निशमन दल, आपत्कालीन सेवा, राज्य पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रविवारी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप सुटका झाली आहे. या बचावकार्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. उत्तर गोवी पोलिसांचे एसपी अक्षत कौशल यांनी ही माहिती दिली.
गोव्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र असे असतानाही पर्यटक बाहेर फिरायला जात आहेत.गोव्याला पाली धबधबा खूप प्रसिध्द आहे. शेकडो पर्यटक येथे येतात. रविवारी ही येथे पर्यटक दाखल झाले होते. मात्र पाणी वाढल्याने सर्व पर्यटक अडकले. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागे, पण तीही पूर्णपणे ओसंडून वाहत होती.
अडकलेल्या पर्यटकांनी वालपोई पोलिस ठाण्यात संपर्क साधला. यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले. या संदर्भात माहिती देताना एसपी म्हणाेल की, दुपारपर्यंत ५० जणांची सुटका करण्यात आली आणि उर्वरित ३० जणांना संध्याकाळपर्यंत बाहेर काढण्यात आले. हवामान विभागाने सांगितले की, गोव्यात सतत पाऊस पडत असल्याने रेड अलर्ट जारी केला आहे.