Live Telecast Of Consecration In Ram Temple: राममंदिराचा जल्लोष परदेशातही पाहायला मिळणार; टाइम्स स्क्वेअरवर होणार राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेचे थेट प्रक्षेपण

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवरही (Times Square) याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध देशांतील भारतीय दूतावासांमध्येही अभिषेक प्रसारित केला जाणार आहे. यावेळी पीएम मोदी राम भक्तांना संबोधित करणार आहेत.

Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

Live Telecast Of Consecration In Ram Temple: 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) अभिषेकाचे (Consecration) थेट प्रक्षेपण देशातच नाही तर परदेशातही होणार आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवरही (Times Square) याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध देशांतील भारतीय दूतावासांमध्येही अभिषेक प्रसारित केला जाणार आहे. यावेळी पीएम मोदी राम भक्तांना संबोधित करणार आहेत.

तथापी, पीएम मोदी समारंभाच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याशिवाय त्यांनी राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेच्या सर्व विधी आणि नियमांबद्दल तपशीलवार माहिती देखील मागितली आहे. (हेही वाचा -Chef Vishnu Manohar Will Prepare Ram Halwa: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नागपूरचे शेफ विष्णू मनोहर तयार करणार 7000 किलो 'राम हलवा')

रामलल्लाच्या अभिषेकसाठी शुभ काळ निश्चित करण्यात आला आहे. ही वेळ 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12:29 ते 12:30 पर्यंत असेल. राम मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे. यात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. (हेही वाचा - Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठासाठी '22 जानेवारी' हा दिवस का निवडण्यात आला? काय आहे यामागचं खास कारण? जाणून घ्या)

रामलल्लाची मूर्ती कोणी बनवली?

रामललाची मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. ही मूर्ती पाच वर्षांच्या मुलाच्या रूपात आहे. त्याचबरोबर लहान मंदिरात सध्या स्थापित असलेली जुनी मूर्तीही नवीन मूर्तीचाही गाभाऱ्यात अभिषेक करण्यात येणार आहे.